‘त्या’ सफाई कामगाराचा उपचारादरम्यान मृत्यू

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी साकोली : साकोली पोलीस स्टेशन मध्ये २१ वर्षापासून सफाई कामगार म्हणून काम करणारा रमेश परसराम रामटेके वय ६१ हा आपल्या स्वगावी सराटीला साकोली पोलीस स्टेशन मधील सफाईची कामे करून रविवारी सायंकाळी सात वाजता जात असताना सराटी फाट्यावर अज्ञात वाहनाने त्याच्या सायकलला धडक दिल्याने रमेश हा गंभीर जखमी झाला उपचारासाठी साकोली उपजिल्हा रुग्णालयात भरती करण्यात आले परंतु गंभीर असल्याने त्याला भंडारा जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले परंतु सोमवारी त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला त्याच्या पश्चात पत्नी व दोन मुले असा आप्त परिवार आहे. २१ वर्षापासून साकोली पोलीस स्टेशनची सफाई करणाºया रमेश याच्या मृत्यू पक्षात साकोली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक जितेंद्र बोरकर व पोलिस कर्मचारी यांनी त्याच्या कुटुंबीयांना सांत्वन पर ४५ हजार रुपयाची मदत केलेली आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *