सिल्ली येथे सार्वजनिक कार्यक्रमात ‘हंगामा’

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : दिवाळी हंगामा कार्यक्रमादरम्यान हुल्लडबाजी करणाºया तरुणांकडून आयोजकांना मारहाण करण्यात आली आहे. तरुणांना समजवायला गेलेल्या भंडारा पंचायत समितीच्या उपसभापतींसह चार आयोजकांना तरुणांनी लाठ्याकाठ्यांनी जबर मारहाण केल्याची घटना भंडारा तालुक्याच्या सिल्ली गावात मध्यरात्री घडली.विशेष म्हणजे रात्री ११ वाजल्यानंतरही सदर कार्यक्रम सुरूच होता. त्यावरून युवकांनी वाद झाल्याची माहिती आहे. जखमींवर भंडारा शहरातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. एका विधिसंघर्षग्रस्त बालकासह पाच तरुणांवर कारधा पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला असून सर्वांना अटक करण्यात आली आहे. भंडारा तालुक्याच्या सिल्ली गावात दिवाळीनिमित्त ग्रामीण लोककलेचा विना परनवानगी ‘हंगामा कार्यक्रम’ आयोजित करण्यात आला होता. यावेळी मध्यरात्री तिथे कार्यक्रम बघण्यासाठी आलेल्या तरुणांनी हुल्लडबाजी करायला सुरुवात केली. त्यामुळे त्यांना समजावण्याचा प्रयत्न करण्यासाठी प्रशांत खोब्रागडे व इतर चार लोक गेले असता यावरून दोन गटात सुरुवातीला शाब्दिक वाद सुरू झाला. त्यानंतर दोन्ही गटात राडा होऊन दोन्ही बाजुंनी लाठ्याकाठ्यांनी मारहाण सुरू केली. यात चौघांना मारहाण झाली. जखमींना भंडारा येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. याप्रकरणी तक्रारीवरून चौघांविरोधात गुन्हा नोंद करत त्यांना अटक केली असून अधिक तपास सुरू आहे.या घटनेला कारणीभूत असलेल्या सांस्कृति कार्यक्रम ‘हंगामा’ ला कुठल्याही विभागाची परवानगी नसतांनाही कार्यक्रम रात्री उशिरापर्यंत चालविल्याने आयोजकांवर कारवाई करण्याची मागणी गावकºयांनी केली असुन त्यासंदर्भात जिल्हा पोलीस अधिक्षक यांना निवेदन देण्यात आले आहे

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *