रेल्वेच्या धडकेने इसमाचा मृत्यू

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी तिरोडा :ं तिरोडा खैरलांजी मार्गावरील रेल्वे गेट जवळ एका इसमाचा रेल्वेचे धक्क्याने मृत्यृ झाल्याची घटना ३० जानेवारी रोजी घडली. याप्रकरणी तिरोडा पोलीस स्टेशन येथे आकस्मिक मृत्यूची नोंद करून पुढील तपास सुरु आहे. आंबेडकर वार्ड तिरोडा येथील पौर्णिमा रवी घरडे या महिलेने तिरोडा पोलीस स्टेशन येथे दिलेल्या माहितीनुसार तिचे पती रवी घरडे (४०) रा. तिरोडा हे आज दिनांक ३० जानेवारी रोजी सकाळी घरी नसल्याचे दिसून आल्याने आसपास शोध घेतला असता खैरलांजी मार्गावरील रेल्वे चौकी जवळील रेल्वे ट्रॅक जवळ एक इसम पडून असल्याची माहिती मिळाल्यावरून तिथे जाऊन पाहिले असता सदर ईसम तिचे पती रवी घरडे असल्याचे दिसून आले. त्यांचा मृत्यू रेल्वेच्या धडकेने झाल्याचे दिसून येत असल्याने फिर्यादी तक्रारीवरून तिरोडा पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.