अनियंत्रित वाहन पार्किंगला जबाबदार कोण?

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी गोंदिया : दिवसेंदिवस शहरातील बाजारापेठेतील रस्त्यांवर वाढते अतिक्रमण व त्यावर होणारी वाहतूक कोंडी, अनियंत्रित पार्किंग व्यवस्था आदि समस्या डोकेदुखीचे ठरत आहे. यावर कायमचा तोडगा काढण्यासाठी जिल्हा पोलिसांनी आॅगस्ट महिन्यात पार्किंगचा अँक्शन प्लान तयार केला. दिवाळी सणापुर्वी प्लॅनची अंमलबजावणी सुरू केली. मात्र अवघ्या दोन दिवसातच गोंदिया शहरातील वाहतूक कोंडी व पार्किंग व्यवस्था ह्यजैसे थेह्णच्या परिस्थितीत पहावयास मिळत आहे. त्यामुळे या अनियंत्रित पार्किंगला जबाबदार कोण? असा सवाल सुज्ञ नागरिकांकडून उपस्थित होत आहे. शहरातील अनियंत्रित पार्किंग आणि रस्त्यावरील व्यापाºयांचे वाढत्या अतिक्रमणामुळे होणाºया वाहतुकीची कोंडी ही नागरिकांसाठी सर्वात मोठी समस्या आहे. या समस्येला नागरिकच समोर जात नसून वाहतूक पोलिसांना देखील मोठी डोकेदुखी करून घ्यावी लागते. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी गोंदिया पोलिसांनी आॅगस्ट महिन्यात पार्किंगचा अँक्शन प्लान तयार केला. या प्लॅनची अंमलबजावणी वाहतूक पोलिस निरीक्षक महेश बन्सोडे यांनी दिवाळीपूर्वी सुरू केली. दरम्यान शहरातील ४२ रस्त्यांचा पार्किंग व्यवस्थेला घेवून वेळापत्रकही जाहिर केला. एवढेच नव्हेतर रस्त्यांच्या दोन्ही बाजुला पार्किंग व्यवस्थेच्या वेळापत्रकानुसार तारखांचे फलकही लावले. शिवाय पोनि महेश बन्सोडे हे खुद्द रस्त्यावर उतरून व्यापाºयाच्या अतिक्रमण आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र अवघ्या दोन दिवसात या अँक्शन प्लानचे तीनतेरा वाजल्याचे दिसत आहे. पार्किंग व्यवस्थापनाच्या वेळापत्रकाची उघडपणे पायमल्ली करून रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहने उभे केली जात आहेत. त्याच प्रमाणे नो-पार्किंग झोनमध्ये दुचाकी, चारचाकी वाहने पार्किंग केलेली पहावयास मिळत आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *