विदर्भात सहा महिन्यात ५२ कोटीची वीज चोरी उघड

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी नागपूर : महावितरणच्या सुरक्षा व अंमलबजावणी विभागाच्या वतीने मागील सहा महिन्यात विदर्भात करण्यात आलेल्या कारवाईत सुमारे ५२ कोटीची वीज चोरी उघडकीस आली असून अशा प्रकरणात वीज चोरीच्या दंडाची रकम न भरणाºया ९८ वीज ग्राहकांविरुद्ध वीज कायद्यान्वये पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नागपूर पादेशिक विभाग अंतर्गत उपसंचालक (सुरक्षा व अंमलबजावणी) यांच्या माध्यमातून एप्रिल २०२२ ते सप्टेंबर २०२२ या कालावधीत विदर्भात राबविण्यात आलेल्या तपासणी मोहिमेत १ हजार २७३ ग्राहकांकडे वीज चोरी आढळून आली.ही वीज चोरी सुमारे ५२ कोटी २३ लाख रुपयांची होती. यात विद्युत कायदा २००३ नुसार सुधारित २००७ कलम मधील १३५ अनव्ये ६ कोटी ७५ लाखाची तर कलाम १२६ वइतर प्रकरणामध्ये ४५ कोटी ४८ लाखाची अनियमितता वीज चोरी पथकाने उघडकीस आणली. या कारवाईत ९८ वीज ग्राहकांविरुद्ध विविध पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महावितरणच्या वतीने वीज चोरी विरुद्ध सातत्याने कारवाई करण्यात येते.तसेच वीज चोरी होत असल्याची माहिती आढळ्यास त्याची माहिती महावितरणला द्यावी अशी माहिती देणाºयाचे नाव गोपनीय ठेवण्यात येते व त्यास बक्षिसाची रक्कम देण्यात येते, असे महावितरणने कळविले आहे. कार्यकारी संचालक (सुरक्षा व अंमलबजावणी) मुंबई यांच्या मार्गदर्शनाखाली व उपसंचालक (सुरक्षा व अंमलबजावणी) सुनील थापेकर यांच्या नेतृत्वात नागपूर विभागात मंडल स्तरावरील १२ पथके,विभागीय स्तरावरील ३ भरारी पथके यांच्यावतीने वीज चोरी विरुद्ध कारवाई करण्यात आली.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *