प्रस्तावित कोराडी औष्णिक विद्युत केंद्र पर्यावरण विषयक जाहिर सुनावणी संपन्न

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी नागपूर : २७६६० मेगावाट क्षमतेच्या बदली संचासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने आयोजित केलेल्या कोराडी येथील पर्यावरणीय लोकसुनावणी मध्ये महानिर्मितीतर्फे कार्यकारी संचालक(पर्यावरण व सुरक्षितता) डॉ.नितीन वाघ यांनी भूमिका मांडली. जनसुनावणीच्या प्रारंभी महानिर्मितीने प्रत्यक्षात या प्रकल्पासाठी पेंच मधून अंशत: पाणी पुरवठा होणार असला तरीही भांडेवाडी प्रकल्पातून हे प्रक्रियायुक्त पाणी फार मोठ्या प्रमाणात वापरले जाणार असल्याने कोराडी वीज केंद्राला पूवार्पार मंजूर असलेल्या पाण्याच्या मंजूर कोट्यामध्येच हा वापर होणार आहे. विस्तृत तपशीलवार सादरीकरण केले व त्यायोगे महानिर्मितीची प्रकल्प संबंधित माहिती सादर करण्यात आली.

त्यानंतर सुमारे सहा तास सुरू असलेल्या जनसुनावणीत उपस्थित झालेल्या प्रश्नांवर ,शंका कुशकांचे समाधान डॉ. नितिन वाघ यांचेतर्फे करण्यात आले. बदली संचाचा प्रकल्प कोराडीतच करण्याचा उद्देश अतिरिक्त जमीन अधिग्रहण नाही, कोणीही विस्थापित होणार नाही, कर्मचारी वसाहत, मुबलक जमीन उपलब्ध आहे, पाणी, रेल्वे, पायभूत सुविधा कोळसा उपलब्धता, सांडपाण्यावर प्रक्रिया केलेल्या पाण्याचा वापर करण्यात येणार आहे. महानिर्मितीने मागील ३ वर्षांपासून विविध वीज संचासाठी एफ.जी.डी. निविदा प्रक्रिया सुरू केली होती. मात्र केंद्र शासनाने वेळोवेळी दिलेले निर्देश, काही तांत्रिक कारणे आणि कोविड मुळे काही काळ प्रक्रिया रखडली होती आणि अन्य राज्यातील औष्णिक प्रकल्पातही असा विलंब झालेला आहे .

सध्या भुसावळ ६६० मेगावाट प्रकल्पात महानिर्मिती एफ.जी. डी. लावत आहे आणि पुढील महिन्यात जून मध्ये कोराडी ३७६६० मेगावाट संचांकरिता एफ जी डी.निविदा कायार्देश देण्यात येणार आहेत. विशेष म्हणजे कोराडी , खापरखेडा, पारस येथे अगोदरच एफ.जी. डी.चे कामप्रगतीपथावर असल्याचे त्यांनी सांगितले. एकूणच अन्य राज्याच्या तुलनेत महानिर्मितीने एफ जी प्रणाली प्रक्रियेला अधिक गती दिलेली आहे. एफ जी डी सोबत आधुनिक तंत्रज्ञानासह पर्यावरणपूरक उपकरणे लावण्यात येणार असल्याने प्रदूषण आणखी कमी राखण्यात मोलाचा हातभार लागणार आहे. कोळसा पुरवठा महानिर्मितीच्या मालकीच्या गरेपालमा-२ छत्तीसगढ येथील खाणीतून कोळसा पुरवठा होणार आहे.

पाण्याचे प्रदूषणावर प्रतिबंधात्मक कार्यवाहीसाठी “झिरो डिस्चार्ज ” संकल्पने अंतर्गत पाण्याचा पुनर्वापर, शून्य निचरा तसेच आवश्यक त्या सर्व उपाय योजना प्रत्यक्षात करण्यात येणार असल्याचे त्यांनीसांगितले. सध्या कोरडी राख आणि बंधाºयातील राख ही समस्या असली तरी वने आणि पर्यावरण आणि वातावरण बदल मंत्रालयाच्या नवीन निकषानुसार आगामी काळात १०० टक्के राखेची उपयोगितेचे लक्ष्य पूर्ण करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले कारण मोठ्या शहरांमध्ये राखेची मागणी असून अनेक मोठ्या कंपन्या यासाठी इच्छुक आहेत.त्यासाठीची प्रक्रिया सुरू आहे महानिर्मितीने २०५१ प्रकल्पग्रस्तांपैकी याबाबत माहिती घेतली असता वीज प्रकल्पाच्या प्रदूषणामुळे कोणतीही आरोग्य विषयक नकारात्मक माहिती नसल्याचे त्यांनी सांगितले.

तसेच महानिर्मितीचे कर्मचारी मोठ्या संख्येने गेल्या ४०-५० वर्षांपासून कोराडी खापरखेडा येथील कर्मचारी वसाहतीत वास्तव्य करून आहेत ,तसेच त्यांच्या आरोग्याची पूर्ण काळजी घेण्यात येते. परिसरातील ग्रामपंचायतीच्या मागणी नुसार सांघिक सामाजिक जबाबदारीतून विकास कामे करण्यात येणार आहेत. हरितपट्टा विकसित करण्याकरिता मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड प्रस्तावित आहे व त्यास जिओ टॅगिंग करण्यात येणार आहे. १९५२ व्यक्तींना रोजगार दिला आहे आणि ९९ व्यक्तींना प्रगत कुशल प्रशिक्षणार्थी म्हणून सामावून घेतले आहे आणि ६६० मेगावाट वीज संचामध्ये सुमारे ३५०० रोजगार उपलब्ध झाले आहेत. नवीन बदली संच प्रकल्पात मोठ्या प्रमाणात स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत.

महानिर्मिती स्वत: च्या मनुष्यबळासोबतच परिसरातील नागरिकांच्या आरोग्याबाबत सजग आहे. त्यामुळे आरोग्य शिबिरे, आरोग्य तपासण्या करण्यासाठी कटिबद्ध आहे. महानिर्मितीने जिल्हा आरोग्य अधिकारी आणि संबंधित आरोग्य यंत्रणेकडून कर्करोग, श्वसनरोग , मुलांचे आजार खाजगी संस्थेने घेतलेल्या आक्षेपानुसार कोराडी परिसरात जड धातू असल्याचा आरोप होता त्यावर वने पर्यावरण व वातावरण बदल मंत्रालय, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्र मंडळाने संयुक्तरित्या राखेचे, जमिनीचे, पाण्याचे नमुने एन.ए.बी. एल. आणि बी.ए.आर.सी. तज्ज्ञ आणि नामांकित संस्थेकडून तपासले असता त्याचे परिमाण मर्यादेत असल्याचे आढळून आले. त्यानंतर लोक सूनावणीमध्ये प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या लोक सुनावणी प्रक्रियेवर घेतलेल्या आक्षेपांवर श्री.भादुले उप प्रादेशिक अधिकारी यांनी पुराव्यासह संदर्भ देत सर्व मुद्यांना समर्पक उत्तरे दिली.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *