भंडारा आगारात निमआराम गाडया प्रवाशांच्या सेवेत

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : भंडारा विभागातील भंडारा आगारात दाखल झालेल्या नऊ अत्याधूनिक पद्धतीच्या निमआराम गाडयांचा लोकार्पण सोहळा आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्या हस्ते झाला. भंडारा बसस्थानक येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शिवसेनेचे अनिल गायधने, नियत्रंण समिती क्रमांक ३ चे उपमहाव्यवस्थापक श्रीकांत गभणे, विभागाचे यंत्र अभियंता (चालन) महेंद्र नेवार, आगार व्यवस्थापक येतीश कटरे, सहाय्यक कार्यशाळा अधिक्षक विरेंद्र गभणे आणि आगाराचे पर्यवेक्षक व इतर कर्मचारी उपस्थित होते. लोकार्पण झाल्यानंतर बसने आमदार महोदयांनी नागपूर नाका, राजीव गांधी चौक, मुस्लिम लायब्ररी चौक असा प्रवास केला. नंतर भंडारा बसस्थानक परिसराची पहाणी केली. यावेळी बसस्थानकाचे नुतनीकरण, सौंदर्यीकरण व बस स्थानकानकावर सर्व अत्याधुनिक सोयी सवलती प्रवाशांना उपलब्ध व्हाव्यात यासाठी शासनाकडे पाठपुरावा करण्याचे आश्वासन आ.भोंडेकर यांनी दिले.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.