पोलीस विभागाची अवैध व्यवसायाविरोधात धडक कारवाई

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : जिल्ह्यातील पोलीसांनी अवैधरित्या सुरू असलेल्या जुगार व दारु व्यवसायांवर धाड घालुन एकुण २३ गुन्हे दाखल करून ७४ हजार ६५५ रूपयांचा मुद्देमाल जप्त केला. जिल्हयातील अवैध धंदयाचा नायनाट करण्याचे उदिष्टाने जिल्हा पोलीस अधिक्षक लोहित मतानी यांनी पोलीस दलास अवैध धंदयाबाबत धडक मोहीम राबविण्याचे आदेश देण्यात आले आहे. त्यानुसार भंडारा, तुमसर, लाखनी येथे अवैध जुगार व भंडारा, जवाहरनगर, मोहाडी, कारधा, मोहाडी, वरठी, तुमसर, आंधळगाव, गोबरवाही, साकोली, लाखनी व अडयाळ येथील ठाणेदार यांनी आपले अधिकारी व कर्मचा-यांचे पथक तयार करुन अवैध ध्ांंदे करणाºया व्यवसायांनावर धाडीच्या कार्यवाहीचे सत्र सुरु केले आहे. दिनांक १२ आॅक्टोंबर २०२२ रोजी पोलीस स्टेशन भंडारा, तुमसर, लाखनी येथे कलम १२ (अ) म. जु. का. अन्वये कार्यवाही करुन एकुण ७७८५ रूपयांचा मुद्देमाल मिळुन जप्त केला. तर पोलीस स्टेशन भंडारा, जवाहरनगर, मोहाडी, कारधा, मोहाडी, वरठी, तुमसर, आंधळगाव, गोबरवाही, साकोली, लाखनी व अडयाळ येथे कलम कलम ६५ (ई) म.दा.का अन्वये कार्यवाही करुन एकुण ६६ हजार ८७० रूपयांचा मुद्देमाल जप्त केला. सदरची कार्यवाही जिल्हा पोलीस अधिक्षक लोहित मतानी, यांचे मार्गदर्शनात भंडारा, जवाहरनगर, मोहाडी, कारधा, मोहाडी, वरठी, तुमसर, आंधळगाव, गोबरवाही, साकोली, लाखनी व अडयाळ येथील ठाणेदार व यांचे अधिनस्त पथकातील अंमलदार यांनी उत्तमरित्या पार पाडली.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *