शेतातील चिखलात पडून शेतमजुराचा मृत्यू

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी लाखांदूर : धानाच्या रोवणीसाठी शेतात करुण ठेवलेल्या चिखलात पडून एका शेतमजुराच्या मृत्यू झाल्याची घटना २३ जुलै रविवार रोजी सायंकाळी दरम्यान उघडकीस आली . संजय रामदास कोटरंगे वय (४०) रा .लाखांदूर प्लॉट असे मृतकाचे आहे. संजय कोटरगे हा दामोदर तोंडरे यांच्या मालकीच्या शेतात मजुरीने काम करण्यासाठी रविवारी सकाळी सायकल घेऊन गेला होता. त्याने शेतात काम केल्यानंतर शेत मालक दामोदर तोंडरे यांच्या पत्नीला घरी जातो असे सांगून निघाला मात्र अंधार पडला तरी तो घरी परत आला नसल्याने कुटुंबीयांनी त्याचा शोधाशोध करतांना शेताकडे गेले असता त्यांची सायकल रस्त्यांवर उभी ठेवल्याचे दिसल्यामूळे अधिकच संख्या बळवल्यने शेतात जाऊन बघितले असता संजय रामदास कोटरंगे हा रोवण्याचा बांधीत पडलेला दिसला .त्यामूळे उपस्थित नातेवाईकांनी त्यास तात्काळ उचलून ग्रामीण रुग्णालय लाखांदूर येथे उपचाराकरिता आणले असता डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले. राहुल कैलास कोटरंगे यांनी सदर घटनेची तोंडी रिपोर्ट लाखांदूर पोलिस स्टेशन येथे दिले असता पोलिसांनी मार्ग दाखल केला .असून पुढील तपास लाखांदूर पोलिस करीत आहेत. शवविच्छदनानंतर सोमवारी लाखांदूर येथील चुलबंद नदी घाटावरील स्मशानभूमीत अंत्य संस्कार करण्यात आले.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *