महानत्यागी बाबा जुमदेवजी जयंतीनिमित्त कांद्री ते मोहाडीपर्यंत प्रथमच भव्य बाईक रॅली यशवंत थोटे

मोहाडी : महानत्यागी बाबा जुमदेवजी यांनी अहोरात्र परिश्रम करून दु:खी कष्टी,गोर गरीब जनतेला चार तत्व, तीन शब्द, पाच नियमाच्या माध्यमातून सुखाचा मार्ग दाखविला. त्याचीच ही गर्दी सेवकांची आज पाहायला मिळत आहे. सेवकांनी स्वखर्चातून स्वत:ची बाईक घेऊन मोठया संख्येने कांद्री ते मोहाडी रॅलीमध्ये सहभागी झाले, त्याचाही आनंद आहे तसेच सेवकांचे कौतुक पण आध्यात्मिक प्रमुख तथा मानवधर्म प्रचार व प्रसारिका लता बुरडे यांनी उपस्थित सेवकांना केले. एकीकडे जयंती तर जन्मोत्सव सुद्धा साजरा होतांना दिसत आहे. बाबाचे सेवक महाराष्ट्र इतरही राज्यामधे मोठया प्रमाणात आहेत. बहुउद्देशीय परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ,मोहाडीच्या वतीने सोमवार दि.३ एप्रिल २०२३ ला महानत्यागी बाबा जुमदेवजी यांची १०२ वी जयंती व जन्मोत्सव सुद्धा साजरा करण्यात आला. आध्यात्मिक प्रमुख तथा मानव धर्म प्रचार व प्रसारिका लता बुरडे यांच्या शुभ हस्ते रॅलीची सुरुवात झाली. कांद्री ते मोहाडी भव्य बाईक रॅलीकरिता भगवान पिल्लारे, कैलास ढबाले, लक्ष्मण माहुले, राज सार्वे, पवन आसुटकर यवतमाळ, रोहित मरस्कोल्हे, रणधीर निमजे, आकाश ठवकर, सुजित बुरडे, संकेत पिंगरे, अभिलाष रामप्रसाद दमाहे (सिरसोली), वैभव राखडे, शुभम साठवणे, प्रशांत मानापुरे, ज्ञानेश्वर बावणे, तेजराम अंबिलकर, आकाश डोये, इंद्रपाल मते, भास्कर निंबार्ते, इंजी.विपीन चौधरी, राजेश निंबार्ते, उमेश मोहतुरे, भूषण डहारे, तुलसीदास खऊड, वर्षाव अहिर यांच्या नेतृत्वाखाली मोहाडी शहरातून शोभायात्रा काढण्यात आली. जिल्ह्यातील सेवक मोठया संख्येने सहभागी झाले होते. सर्वांच्या चेहºयावर आनंद मावेनासा झाला होता. दिपप्रवलन करून बाबांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण केले. ५२ किलोचा केक कापून जन्मोत्सव उत्स्फूर्तपणे साजरा करण्यात आला.
शिवानी बुरडे सेविकेने उपस्थितांचे स्वागत गीताने स्वागत केले. कार्यक्रमाला आध्यात्मिक प्रमुख तथा मानव धर्म प्रचार व प्रसारिका लता बुरडे कांद्री हे होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी यशवंत ढबाले गुरुजी होते. प्रमुख पाहुणे म्हणून उपाध्यक्ष नरेश सव्वालाखे, सचिव मोरेश्वर सार्वे, संचालक राजू माटे, गुरू शेंडे, जि.प.सदस्य नरेश ईश्वरकर, खेमराज पंचबुद्धे, पं.स.सदस्य उमेश भोंगाडे, कंठीराम पडारे, एकनाथ जिभकाटे, राजू पिल्हारे हे होते. प्रकाश निंबार्ते, सुरेंद्र कस्तुरे, विजय दमाहे, विनोद तांडेकर, भुमेश्वर पारधी यांनी ५२ किलो केकचे नियोजन केले. बाहेरगावाहुन सेवकांच्या स्नेहभोजनासाठी महिला समितीचे अध्यक्ष दुर्गा गौरीशंकर मेहर, उपाध्यक्ष तनुजा सुर्यकिरण सव्वालाखे, सचिव उज्वला गुणवंत घुमे, कोषाध्यक्ष सविता तेजराम आंबिलकर मोहंगावदेवी, सहसचिव विद्या दिपक बोंदरे बोथली, सदस्य भावना परमानंद थोटे, वंदना मदन कनोजे, रंजना लक्ष्मण ठोंबरेबेटाळा, शालु सुरेश चिंधालोरे, कुंदा पदमकुमार गभने, ज्योती इंद्रपाल मते इंदूरखा, ज्योती राजेश राखडे दहेगाव, अंजु राजु माटे अकोलाटोला, अल्का शैलेश भोंगाडे, मिना गणेश मेहर, रत्नमाला दामोधर चोपकर कोथुर्णा, अर्चना प्रदिप चकोले रोहा, सविता राजेश पुडके, सोनु सुनिल बोंदरे, श्रध्दा प्रशांत मानापुरे, कुसुम विलास पाटील, मेघा नामदेव कोल्हे, ज्योती पदमानंद गभने, कविता बालाराम साकुरे, सुभद्रा श्रीपत बाभरे बोथली,चंद्रकला सत्यवान निपाने, अनिता अनिल ठवकर पांजरा, शिपाई आकाश ठवकर, गिरजा कुंभारे यांनी परिश्रम केले. सायंकाळी सेवकांच्या मुला-मुलींनी सांस्कृतिक नृत्य प्रस्तुत केले. उपस्थित सेवकांनी स्नेहभोजनाचा आस्वाद घेतला. बाबांच्या जन्मोत्सव, जयंतीनिमित्त प्रास्ताविक बहुउद्देशीय परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ मोहाडीचे सचिव मोरेश्वर सार्वे यांनी केले. उपस्थित सेवकांचे मोठया मनाने आभार मानले. मोहाडी प्रथमच परमात्मा एक शोभायात्रामध्ये बाहेर गावावरून सेवक-सेवकांची गर्दी मोठया संख्येने दिसून आली.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *