शेतकºयाचा पोळ्याचे दिवशीच दुर्दैवी मृत्यू

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी तिरोडा : तिरोडा तालुक्यातील नवेगाव येथील शेतकरी आपले शेतात खत मारावयास गेले असता शेतातच मरण पावल्याने नवेगाव परिसरात शोक कळा पसरली आहे. नवेगाव येथील शेतकरी रामदयाल केशवराव पटले ५० वर्ष हे आज दिनांक १४ रोजी सकाळी आठ वाजता चे दरम्यान आपले शेतात खत मारावयास गेले असता त्यांना हृदय विकाराचा झटका आल्याची शक्यता असून शेतातच मरुण पडले होते ते दुपारपर्यंत घरी परत न आल्याने त्यांचे परिवारातील लोकांनी शेतात जाऊन पाहिले असता ते शेतात मृतावसथेत पडले असल्याचे दिसून आल्याने याची सूचना त्वरित पोलिसांना देण्यात आल्या वरून हवालदार शिवलाल धावडे व शिपाई महेंद्र अंबादे यांनी त्वरित घटनास्थळ गाठून पंचनामा करून प्रेत उपजिल्हा रुग्णालय तिरोडा येथे शव विच्छेदनाकरता पाठवून शव विच्छेदनानंतर प्रेत परिवाराचे स्वाधीन करण्यात आले असून पोलीस स्टेशन तिरोड येथे आकस्मात मृत्यूची नोंद घेण्यात आली आहे. ऐन पोळ्याचे दिवशीच शेतकºयाचा आकस्मिक मृत्यू झाल्याने नवेगाव परिसरात शोक कळा पसरली आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *