अल्प कालावधीत घरकुल बांधणाऱ्या ५ ग्रामपंचायती सन्मानित

दै. लोकजन वृत्तसेवा लाखनी ः- स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अमृत महाआवास अभियास ग्रामीण अंतर्गत २० नोव्हेंबर २०२२ ते ५ जून २०२३ या कालावधीत उत्कृष्ट घरकुल बांधणाऱ्या भूगाव, कनेरी, इसापूर, सालेभाटा, कन्हाळगाव ह्या ५ ग्रामपंचायतीला तालुका स्तरावर सन्मानित करण्यात आले असून सभापती प्रणाली विजय सार्वे, उपसभापती गिरीश बावनकुळे, गटविकास अधिकारी अरुण गिरेपुंजे आणि पंचायत समिती सदस्यांच्या हस्ते संबंधित ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच व ग्रामसेवक यांना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. अमृत महाआवास अभियान ग्रामीण अंतर्गत कमी कालावधीत उत्कृष्ट घरकुल बांधकाम करणाऱ्या भूगाव, कनेरी, इसापूर, सालेभाटा, कन्हाळगाव ह्या ग्रामपंचायतीस तालुकास्तरीय पुरस्कार वितरण समारोहाचे गुरुवारी (ता.३१) पंचायत समिती सभागृहात आयोजन करण्यात आले होते.

अध्यक्षस्थानी सभापती प्रणाली विजय सार्वे,प्रमुख अतिथी उपसभापती गिरीश बावनकुळे, पंचायत समिती सदस्य रवींद्र (दादू) खोब्रागडे, सुरेश झंझाड, किशोर मडावी, विकास वासनिक, सुनील बांते, पंचायत समिती सदस्या योगिता झलके, शारदा मते, मनीषा हलमारे, अश्विनी मोहतूरे, सविता राघोर्ते, गटविकास अधिकारी अरुण गिरेपुंजे, पंचायत विस्तार अधिकारी प्रमोद हूमने, सहाय्यक कनिष्ठ अभियंता माधुरी घरडे यांचे प्रमुख उपस्थितीत घेण्यात आला. पुरस्कार प्राप्त भूगाव, कनेरी, इसापूर, सालेभाटा, कन्हाळगाव ह्या ५ ग्रामपंचायतीच्या सरपंच उपसरपंच व ग्रामसेवक यांना पुरस्कार स्वरूप सन्मानचिन्ह व प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले. पुरस्कार वितरण समारंभाचे सूत्र संचालन व आभार कृषी विस्तार अधिकारी के. एन. चव्हाण यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी ग्रामीण गृह निर्माण अभियंता संदीप भैसारे, अजित चांदेवार, राहुल शेंद्रे, मयूर शेंडे, साक्षी साखरे, शुभम कांबळे, एकलव्य हटनागर, पराग जिभकाटे, संगणक परिचालक शिवशंकर भदाडे, अरूणा राऊत यांनी अथक परिश्रम घेतले.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *