भंडारा स्थानिक गुन्हे शाखेची जुगार अड्यावर धाड

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : जवाहरनगर पोलिस स्टेशन अंतर्गत येणाºया सावरी येथे एका घरात सुरू असलेल्या जुगार अड्यावर स्थानिक गुन्हे शाखा भंडाराच्या पथकाने कारवाई केली. यावेळी आठ जुगाड्ढयांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याकडून २ लाख ३८ हजार ९३० रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. सावरी येथील रहिवासी भिमराव गोविंदा लाडे यांच्या घरी जुगार अड्डाचालविला जात असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. माहितीच्या आधारे १७ जून रोजी पोलिसांनी भिमराव लाडे यांच्या घरी धाड घातली.

त्यावेळी त्यांना जुगार अड्डा सुरू असल्याचे व येथे भिमराव गोविंदा लाडे (६५) रा. सावरी, अमरदिप पंढरी वालदे (४६), अशोक पांडुरंग गजभिये (५५) दोघेही रा. जवाहरनगर, होमचंद नामदेवराव धकाते (४२), प्रमोद तुळशीपाल सतदेवे (३२), निलेश ईश्वरदास जांभुळकर (३६) तिघेही रा. भंडारा, सुजित लक्ष्मण कावळे (५०) रा. पेट्रोलपंपठाणा, भारत जोंधरू बारई (४०) रा. राहुली हे जुगार खेळताना मिळून आले. त्यांच्या ताब्यातून जुगार खेळण्याचे साहित्य व ३ मोटारसायकल असे एकूण २ लाख ३८ हजार ९३० रुपयाचा मुद्देमालजप्त करण्यात आला. याप्रकरणी पोलिस स्टेशन जवाहरनगर येथे गुन्हा दाखल करण्यात आला. सदर कारवाई पोलिस अधीक्षक लोहित मतानी , अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, भंडारा उपविभागीय पोलिस अधिकारी अशोक बागुल यांच्या मार्गदर्शनाखाली भंडारा स्थानिक गुन्हे शाखा पथकातील पोलीस निरीक्षक नितीनकुमार चिंचोळकर व स्थागुशा च्या पथकाने केली.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.