दोन दुचाकींची आमोरा-सामोर धडक

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी लाखांदुर : विविध कामांकरीता स्वगावावरून लाखांदुरला आलेल्या दोन्ही दुचाकीस्वारांनी आमोरा- सामोर धडक दिली यात दोन्ही दुचाकीस्वार गंभीर जखमी झाले आहेत. सदरची घटना लाखांदुर येथे साकोली – वडसा मार्गावर मडेघाट फाट्यानजीक घडली आहे. विवेक भोजराज दिवठे (२६) रा. आसोला, ता. लाखांदुर व अमोल बळीराम माकडे (२६) रा. मांदेड, ता. लाखांदुर असे घटनेतील जखमींचे नावे आहेत. प्राप्त माहितीनुसार अपघातातील आसोला निवाशी विवेक भोजराज दिवठे हे हिरो स्पेंलंडर गाडी क्र. एम. एच. ३६, ए. के. ५५९९ ने लाखांदुरला आले होते. तर मांदेड निवाशीअमोल बळीराम माकडे हे आपल्या हिरो डिलक्स एम.एच. ३६, एस. ०४९७ ने तालुक्यातील मडेघाट येथे बहीणीच्या गावी गेले होते.

घटनेदरम्यान अमोल माकडे हे मडेघाटवरून लाखांदुर मार्गे योग्य दिशेने मांदेडला जात होते. तर विवेक दिवठे हे गुरूकृपा पेट्रोल पंपावरून पेट्रोल भरून चुकीच्या दिशेने लाखांदुर शिवाजी चौकाकडे येत होते. दरम्यान लाखांदुर येथील साकोली – वडसा मार्गावर मडेघाट फाट्यानजीक धडक दिली असत, यात दोन्ही अपघातजनक इसम गंभीरजखमी झाले आहेत. अपघाता पश्चात आसोला निवाशी विवेक दिवठे यांना लाखांदुर ग्रामिण रूग्णालयात तर मांदेड निवाशी अमोल माकडे यास खाजगी रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. दोघांनाही गंभीर जखमा झाल्या असून, मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला आहे. दोघांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना इतरञ उपचारार्थ हलविण्यात आले असल्याची माहिती असून, सदर अपघातात दोषी कोण..? व कोण कोणत्या दिशेने ये – जा करीत होते. याची माहिती अद्याप प्राप्त नसून, वृत्तलिहीस्तोवर लाखांदुर पोलीसात दोन्ही अपघातातील दुचाकीस्वारांच्या कुटूंबियांकडून तक्रार प्राप्त झाली नाही.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.