बोलेरो पिकअपच्या धडकेत तरूणाचा मृत्यू

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी साकोली : इथून चार किलोमीटर अंतरावर ग्राम कुंभली येथे बोलेरो पिकप वाहनाच्या धडकेत मोटरसायकल सवार इंजिनियर चा मृत्यू झाला. गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव /अर्जुनी तालुक्यातील ग्राम कोरंभी टोला येथील सेवकराम महादेव नाकाडे वय ३० वर्ष असे मृतकाचे नाव आहे. सेवकराम चे लग्न चार महिन्यापूर्वी झाला होता. कुंभली परिसरातील या महिन्यातील दुसरी घटना आहे. मृतक सेवकराम महादेव नाकाडे हा वैद्य इंडस्ट्रीज प्रा. लि. नागपूर या खाजगी बांधकाम कंपनी मध्ये इंजिनिअर म्हणून कामाला होता. त्याचे काम सध्या तुमसर येथे सुरू असल्याने तो दररोज कोरंभीटोला येथून घरून तुमसर येथे मोटार सायकलने येणे जाणे करीत होता. आज दि. १४ जून २०२३ चे सकाळी ०९:०० वा. सुमारास मौजा कोरंभीटोला येथून घरून त्याचे हिरो सुपर स्प्लेंडर मोटार सायकल क्र. एमएच ३५ एएम ५२८० नी तुमसर येथे जाण्यास निघाला. तेव्हा १०:३० वा. सुमारास तो मौजा कुंभली गावातून साकोलीकडे जात असताना साकोलीकडून अंडे घेऊन येणारी मालवाहू महीन्द्रा बोलेरो पिकअप वाहन क्र. एमएच ३६ एफ १९७९ चे चालकाने त्याचे ताब्यातील गाडी भरधाव वेगाने चालवित असताना त्याचे टायर फुटल्याने विरुध्द दिशेने येणा-या सेवकराम नाकाडे याचे हिरो सुपर स्प्लेंडर मोटार सायकल गाडीला समोरून धडक मारली.

त्यामुळे सेवकराम नाकाडे हा गंभीर जखमी झाला. त्याला खाजगी वाहनाने सरकारी दवाखाना साकोली येथे उपचाराकरिता घेऊन गेले. तेथील वैद्यकीय अधिकारी यांनी त्याचेवर प्राथमिक उपचार करून तो गंभीर जखमी असल्याने त्याला भंडारा येथे रेफर केले. सेवकराम नाकाडे याला अ‍ॅम्बुलन्सनी सामान्य रुग्णालय भंडारा येथे उपचाराकरिता घेऊन गेले असता वाटेतच त्याच्या मृत्यू झाला. भंडारा सामान्य रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी यांनी त्याला मृत घोषित केले.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *