साकोलीत सोनोग्राफी सेंटरचे जोरदार मार्केटींग

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : जिल्ह्यातील साकोली तहसील अंतर्गत येणाºया रूग्णालयातील सोनोग्राफी सेंटरचे करण्यात येणारे मार्केटींग सध्या तालुक्यात चर्चेचा विषय बनला आहे.सोनोग्राफी सेंटर ची मार्केटींग करणे हा कायद्याने गुन्हा असला तरी हा कायदा सर्रासपणे मोडला जात आहे.मग असे असतांनाही या गुन्हेगारांवर कारवाई करणार कोण ? असा प्रश्न सर्वसामान्य नागरीकांना पडला आहे. वैद्यकीय क्षेत्रात सोनोग्राफी सेंटरला मोठे महत्व आले आहे. कुठल्याही गंभीर आजाराचे सहजपणे निदान करतांना डॉक्टर सोनोग्राफी मशिनची मदत घेत असतात. त्यामुळे सर्वत्र सोनोग्राफी सेंटरचे जाळे दिवसेंदिवस वाढतच आहे.

जिल्ह्यातील साकोली तालुक्यात सुध्दा सोनोग्राफी सेंटर ची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे साकोली तालुक्यात सोनोग्राफी सेंटर चालकांमध्ये स्पर्धा दिसुन येत आहे. आणि त्यामुळेच कि काय सध्या साकोली तालुक्यात सोनोग्राफी सेंटरची मोठया प्रमाणात मार्केटींग केली जात आहे. तालुक्यात अनेक ठिकाणी भिंतीवर लिखानातुन किंवा पोस्टर चिकटवुन संबंधीतांकडुन रूग्णालय व सोनोग्राफी मशिनचे सर्रासपणे मार्केटींग केले जात आहे. रूग्णसेवा हा सामाजिक कार्याचा भाग असुन डॉक्टरांना त्याचे मार्केटींग करता येत नाही तसा शासकीय नियम आहे.मात्र काही डॉक्टर या नियमांना तिलांजली देत सर्रासपणे स्वत:च्या रूग्णालयाचे मार्केटींग करतांना दिसुन येत आहेत.त्यामुळे शासनाच्या नियमांचे उल्लंघन करणाºया डॉक्टरांवर कारवाई करण्याची मागणी नागरीकांकडुन होत आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *