जिल्ह्यातील मका उत्पादक शेतकºयांना लवकरच मिळणार थकित चुकारा

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : जिल्ह्यातील साकोली, लाखांदूर व लाखनी तालुक्यातील तसेच चुलबंद नदीकाठच्या इतर भागातील शेतकºयांनी घेतलेले मका पिकाची जून महिन्यात शासकीय पातळीवर विक्री करण्यात आली होती. मात्र महिना उलटून गेला तरी मका विक्रीचे पैसे न मिळाल्याने शेतकरी चिंतेत असून आर्थिक अडचणीत सापडला आहे. या गंभीर विषयावर मका उत्पादन करणाºया शेतकºयांनी जिल्ह्याचे माजी पालकमंत्री डॉ.परिणय फुके यांच्याकडे दाद मागितली असता, सुमारे १८ हजार ५४९ क्विंटल मक्यासाठी २ कोटी ४४ लाख ४६ हजार ९१२ रुपये थेट खात्यात जमा करण्याची मागणी केली होती.

जिल्ह्यातील शेतकºयांच्या या गंभीर बाबीची त्वरीत दखल घेत माजी पालकमंत्री डॉ. परिणय फुके यांनी ११ जुलै रोजी राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री रवींद्र चौहान यांची भेट घेऊन भंडारा जिल्ह्य़ातील तसेच इतर शेतकºयांच्या मका उत्पादनाच्या रखडलेल्या चुकारे बाबत सांगितले. ते लवकर शासन स्तरावर मिळावे या मागणीचे पत्र दिले. चर्चेदरम्यान श्री फुके म्हणाले, भंडारा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात शेतकरी भातासोबत मका पीक घेतात. जून महिन्यात शासनस्तरावर मका विकला गेला, मात्र अद्याप त्यांना चुकारे मिळालेला नाही. सध्या खरीप हंगामात भात लागवडीचे काम सुरू आहे. पैसे न मिळाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. शेतकºयांना मका विक्रीचे प्रलंबित पेमेंट मिळू न शकल्याने संबंधित विभागाच्या सचिवांना तातडीने पेमेंट करण्याच्या सूचना अन्न व नागरी पुरवठा मंत्री श्री.चौहान यांनी दिल्या. आता लवकरच मका उत्पादक शेतकºयांना त्यांचे प्रलंबित पेमेंट मिळणार आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *