ट्रक पलटी होवुन चालक जागीच ठार

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : विरूध्द दिशेने जाणाºया ट्रकला अपघात होवुन ट्रक चालक व मालक हे घटनास्थळीच मृत्यू पावल्याची घटना आज दि.४ सप्टेंबर रोजी पहाटे ३ वाजेच्या सुमारास भंडारा तालुक्यातील धारगाव परिसरात घडली. राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या धरगाव येथे धाब्यावर जेवण करण्यासाठी विरुद्ध दिशेने येत असलेल्या ट्रक पलटी झाल्यानेअपघातात ट्रक चालक व मालक यांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना दिनांक ४ सप्टेंबर रोजी पहाटे ३.०० च्या सुमारास घडली. प्रसंगी तिथून प्रवास करणाºयांनी ११२ वर कॉल केल्याने पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहचली. कारधा पोलीस स्टेशनचे कर्मचारी तसेच जिल्हा वाहतूक चे शिवाजी कदम व त्यांची चमू यांच्यासह महामार्ग वाहतूक केंद्र गडेगाव च्या पथकाने चमू घटनास्थळी धाव घेत क्रेन च्या सहायाने मृतकांना बाहेर काढून शव सामान्य रुग्णालयात शवविच्छेदन करिता पाठविण्यात आले.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *