आज रेती चोरी विरुद्ध चक्काजाम आंदोलन

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : वैनगंगा तसेच सूर नदीच्या पात्रातून होणाºया रेती चोरीच्या विरोधात अन्यायग्रस्त शेतकरी संघर्ष समितीच्यावतीने १८ एप्रिलला कोथुर्ना नवीन गावठाण येथे रास्ता रोको आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे .टाकळी खमाटा येथील वैनगंगा नदीघाटातून दररोज शंभर पेक्षा जास्त ट्रॅक्टर रेती चोरी होत आहे. दाभा वळणावर पोलीस चौकी असून या ठिकाणी महसूल विभागाचे कर्मचारी उपस्थित असतात त्यांच्या समक्ष व त्यांच्या आशीवार्दाने खुलेआम रेती चोरी होत आहे .या संदर्भात अन्यायग्रस्त शेतकरी संघर्ष समितीच्यावतीने जिल्हाधिकारी भंडारा यांना प्रत्यक्ष भेटून निवेदन देण्यात आले .जिल्हाधिकारी भंडारा यांनी पुनर्वसन अधिकारी यांच्याकडे निवेदन दिले ते निवेदन त्यांनी खनिकर्म अधिकाºयाकडे दिले.

पंधरा दिवसानंतरही कोणतीच कारवाई झालेली नाही .मात्र मोठ्या प्रमाणात रेती चोरी सुरू आहे.रेती चोरी सुरू असल्याचे तहसीलदार भंडारा यांना फोटो पाठवण्यात आले ते फोटो त्यांनी जिल्हा टिम कडे पाठवले मात्र जिल्हा टिमने काहीही केले नाही .अधिकारी व कर्मचारी एकमेकांकडे बोट दाखवण्याचा काम करीत आहेत अन्यायग्रस्त शेतकरी संघर्ष समितीचे जिल्हा अध्यक्ष चंद्रशेखर भिवगडे, उपाध्यक्ष कोठिराम पवनकर, विष्णुदास लोणारे, पुरुषोत्तम गायधने योगेश गायधने यांच्या नेतृत्वात १८ एप्रिलला सकाळी ११ ते सायंकाळी पाच वाजतापर्यंत नवीन गावठाण कोथुर्ना मार्गावर चक्काजाम आंदोलन करण्यात येणार आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *