मअंनिसच्या दिवाळी अंकाचे थाटात प्रकाशन

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या दिवाळी अंकाचे प्रकाशन माजी नगरसेविका सौ.चंद्रकला भोपे यांच्या हस्ते करण्यात आले. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती जिल्हा कार्यालय भंडारा येथे आयोजित या प्रकाशन सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी मअंनिसचे बुवाबाजी संघर्ष विभागाचे राज्यसहकार्यवाह विष्णुदास लोणारे होते.याप्रसंगी अ‍ॅड. कैलास भुरे, चंद्रकला भोपे आदी मान्यवर उपस्थित होते.महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा दिवाळी अंक हा वैविध्यपूर्ण व वाचनीय असल्याने हा अंक प्रत्येकाने अभ्यासावा असे प्रतिपादन उपस्थित मान्यवरांनी केले.अध्यक्षीय भाषणातून विष्णुदास लोणारे यांनी जाहिरातदारांनी दिलेल्या सहकार्याबद्दल आभार मानून अंधश्रद्धा निर्मूलनाची चळवळ ही विवेकनिष्ठ समाजाच्या सहकार्यावर उभी असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे संचालन प्रा. युवराज खोब्रागडे यांनी केले तर उपस्थितांचे आभार प्रा.नरेश आंबिलकर यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कविता लोणारे,आकांक्षा खोब्रागडे यांनी सहकार्य केले.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *