संघटीत समाजातूनच राष्ट्राच्या परमवैभवाचा मार्ग – महेंद्र रायचुरा

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : समाजाला संघटित करण्याचे काम राष्ट्रीय स्वयंसेवक संघ स्थापनेपासूनच करीत आला आहे. संघटित समाजातूनच राष्ट्राला परमवैभव प्राप्त करून देण्याचा मार्ग जातो. व्यक्तीगत भेद विसरून समाजाने संघाच्या सोबत यावे. संघटित शक्तीतूनच समाजातील समस्या सुटतील आणि समाजात परिवर्तन येईल, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे क्षेत्र धर्मजागरण प्रमुख महेंद्रजी रायचुरा यांनी केले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ भंडारा नगराचा श्री विजयादशमी व शस्त्रपूजन उत्सव २९ आॅक्टोबर रोजी येथील रेल्वे मैदानावर झाला. यावेळी प्रमुख वक्ते म्हणून रायचुरा बोलत होते. व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून सामाजिक कार्यकर्ते आणि समता सैनिक दलाचे दादा कोचे, विभाग संघचालक राम चाचेरे, जिल्हा सहसंघचालक अनिल मेहेर, नगर संघचालक पंकज हाडगे उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते शस्त्रपूजन झाल्यानंतर स्वयंसेवकांनी व्यायाम योगाचे प्रात्यक्षिक केले. नगर कार्यवाह रामकृष्ण बिसने यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. उपस्थित स्वयंसेवक आणि मान्यवर मंडळींना संबोधित करताना रायचुरा पुढे म्हणाले, विजयादशमीचे महत्व अनेक युगापासून आहे. धर्माच्या विरोधात जाऊन काम करणाºयांना चुकीची जाणीव करून देण्याचे कामच एक प्रकारे विजयादशमीच्या निमित्ताने झाले. संघ सर्व जनजाती बांधवांना सोबत घेऊन समाजात काम करीत आहे.

देशाच्या सर्वोच्च पदावर संघाचा स्वयंसेवक बसणे ही ९८ वर्षाची संघाची साधना असल्याची ते म्हणाले. समाजात परिवर्तन घडवून आणायचे असेल तर संघटित समाज हेच महत्त्वाचे सूत्र आहे. संघ सर्व समाजाला सोबत घेऊन परिवर्तनाच्या दिशेने प्रयत्न करीत असून यातूनच परम वैभवाचा मार्ग जातो असेही ते म्हणाले. आजही दृष्टशक्ती संपल्यानाही. आम्हाला दृष्टांना नाही तर त्यांच्यामधील दृष्ट शक्तींना संपायचे आहे. जोपर्यंत समाज एकत्र सोबत उभा राहणार नाही, तोपर्यंत अशा दृष्ट शक्तींचा नायनाट होणे शक्य नाही. संघाने समाजाला घेऊन केलेल्या संघटित कायार्तूनच आज केरळात अस्पृश्यता संपविण्यात यश आले आहे. निरपेक्ष भावनेने काम करणाºया संघ स्वयंसेवकाच्या साधनेचे फलित म्हणून आज प्रत्येक क्षेत्रात देशात परिवर्तन दिसून येत असल्याचे त्यांनी सांगितले. संघटित समाजाला योग्य मार्ग दाखवण्याचे काम संघाने केल्यानेच भविष्यात प्रत्येकाला हिंदुत्वाचा विचार करावाच लागेल असे सांगून व्यक्तीगत भेदभाव विसरून देशापुढील आव्हाने मोडीत काढावयाची असल्यास समाजाला संघासोबत येऊन वाटचाल करावी लागेल असेही रायचुरा म्हणाले.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.