जिल्हा काँग्रेसतर्फे ८ नोव्हेंबरला आक्रोश मोर्चा

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : केंद्रातील भाजप व राज्यातील खोक्याचे सरकार यांच्या गलथान कारभार व चुकीच्या धोरणांमुळे दिवसेंदिवस वाढत चाललेली महागाई, बेरोजगारी, महिलांवरील वाढते अत्याचार, शेतकरी विरोधी धोरणे, सामाजिक देश व जातीय दंगली आदी कारणांमुळे राज्यातील जनता हैराण आहे. तर दुष्काळी परिस्थितीमुळे राज्यातील शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे, त्यांचे जगणेच मुश्कील झाले आहे. तसेच केंद्र व राज्य सरकारच्या आशिर्वादाने राज्यात अंमली पदार्थांची (ड्रग्ज) तस्करी व खुलेआम विक्री मोठ्या प्रमाणात सुरू आहे. यामुळे तरूणांचे जीवन विशेषत: विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात आले आहे. या विषयी पालक वर्गामध्ये फार मोठी चिंता निर्माण झाली आहे. मात्र सरकार या बाबींकडे तीळमात्र लक्ष द्यायला तयार नाही. या सर्व बाबींमुळे जनतेच्या मनातील खदखदत असलेला आक्रोश व्यक्त करण्यासाठी प्रांताध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्या अदेशानुसार भंडारा जिल्हा काँग्रेस कमिटी तर्फे आक्रोश मोर्चा ८ नोव्हेंबर ला हुतात्मा स्मारक ते जिल्हाधिकारी कार्यालय पर्यंत काढण्यात येणार आहे. त्या संदर्भात आज भंडारा जिल्हा काँग्रेस कमिटी तर्फ नियोजन बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

याबैठकीला अध्यक्ष म्हणून प्रदेश उपाध्यक्ष नाना भाऊ गावंडे,भंडारा जिल्हा प्रभारी नंदा ताई पराते व प्रदेश सचिव राजा भाऊ तीडके, भंडारा जिल्हाध्यक्ष मोहनभाऊ पंचभाई, प्रदेश महासचिव जिया पटेल, महिला जिल्हाध्यक्ष जयश्री बोरकर हे प्रामुख्याने उपस्थित होते. भंडारा जिल्हा काँग्रेस चे अध्यक्ष यांनी सर्व प्रदेश पदाधिकारी, जिल्ह्यातिल वरिष्ठ पदाधिकारी, जि. प अध्यक्ष सर्व सभापती, सर्व जिल्हा परिषद सदस्य, व सर्व सेल च्या प्रमुख यांना मोठ्या संख्येने आक्रोश मोर्च्यात आपण सहभागी व्हाव्हे असे आवाहन केले. प्रदेश चे उपाध्यक्ष नानाभाऊ गावंडे यांनी केंद्र सरकार कसे लोकशाहीला घातक असे निर्णय घेत आहे व जाती जातीत तेळ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. मणिपूर च्या हिंसेकडे केंद्र सरकार लक्ष देत नाही असे आरोप सुद्धा त्यांनी केंद्र सरकार वर लावले. यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष गंगाधर जीभकाठे, भरत खंडाइत,प्रेमसागर गणवीर ,पवन वंजारी, प्रशांत देशकर,राजू पालीवाल, अनीक जमा पटेल ,धनराज साठवणे, प्यारेलाल वाघमारे,उमेश कटरे, योगराज झळके,अशोक कापगते,उत्तम बंगळकर, व अनेक काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *