भंडारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची महत्त्वपूर्ण बैठक

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : आज भंडारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने सत्कार कार्यक्रम व पक्षाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. माजी आमदार राजेंद्र जैन यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी च्या राष्ट्रीय सचिव पदी व माजी खासदार मधुकर कुकडे यांची राष्ट्रीय कार्यकारिणीत सदस्य म्हणून नियुक्ती झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. यावेळी संबोधित करतांना राजेंद्र जैन म्हणाले की, खासदार प्रफुल पटेल यांच्या कुशल नेतृत्वात आगामी होणाºया नगर परिषद निवडणुकीत सत्ता स्थापन करायची असेल तर पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सामान्य लोकांच्या अड- ीअडचणी सोडवाव्या लागतील. पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी पक्षाच्या वतीने बूथ स्तरावर जास्तीत जास्त पक्ष सभासद नोंदणी करणे आवश्यक आहे. या बैठकीत प्रामुख्याने राष्ट्रीय सचिव व माजी आमदार राजेंद्र जैन, आमदार राजू कारेमोरे, जिल्हाध्यक्ष नानाभाउ पंचबुधे, धनंजय दलाल, जयंत वैरागडे, महिला अध्यक्षा सरिता मदनकर, महेंद्र गडकरी, डॉ रविंद्र वानखेडे, डॉ श्रीकांत वैरागडे, अ‍ॅड विनयमोहन पशीने, परवेज पटेल, यशवंतराव सोनकुसरे, हेमंत महाकाळकर, जुगल भोंगाडे, राहुल निर्वाण, लोकेश खोब्रागडे, जवाहर निर्वाण, किर्ती नरेंद्र गणविर, जुमाला बोरकर, राजु पटेल, उमेश ठाकरे, सुनील साखरकर, प्रदीप सुखदेवे, राजु साठवने, विक्रम उजवणे, शुभांगी खोब्रागडे, अ‍ॅड नेहा शेंडे, संध्या बोदेले, माधुरी देवके, स्वप्निल नशिने, अश्विन बांगडकर सहित मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ता उपस्थित होते.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *