शुल्लक कारणावरून इसमावर चाकूहल्ला

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी तुमसर : नवीन घराचे बांधकाम होऊन शौचालयाच्या पाईपलाईन वरून शेजारी-पाजारी राहणाºया दोन परिवारात भांडण घडले. मागील आठ दिवसांपासून सुरू असलेले शाब्दिक वाद विकोप्याला येऊन इसमावर प्राणघातक चाकूहल्ला झाल्याची घटना तुमसर-मोहाडी तालुक्यात मोडणाºया सालई बु. येथे गुरुवारच्या सकाळी ११ वाजेच्या सुमारास घडली आहे. सदर घटनेत राजेश धनराज कुथे (४५, राह.सालई बु.) हा गंभीर जखमी झाल्याची माहिती तुमसर पोलीसांनी दिली आहे.

जखमी राजेशवर वंजारी परिवारातील दोन सख्खे भावंड आकाश रमेश वंजा री(२८), विकास रमेश वंजारी(२५) यांनी आपल्या आईवडिल रमेश नामदेव वंजारी(५०) व सुनीता नामदेव वंजारी (४५) चौघेही राह. सालई बु. यांच्या मदतीने हल्ला चढवला. सदर प्रकार जखमीच्या नातेवाईकासमक्ष घडून आल्याची माहिती मिळालीआहे. राजेशच्या पोटावर, मानेवर तसेच पाठीत व डाव्या काखेत जबर घाव लागल्याने त्याची परिस्थिती नाजूक असल्याचे तुमसरच्या डॉक्टरांनी सांगितले आहे. सविस्तर वृत्त असे की, तुमसर-मोहाडीच्या सीमेत असलेल्या सालई बु. येथे घटनेच्या दिवशी जखमी कुथे व त्याचा भाऊ कृष्णा वणवे घरच्या लग्न सोहळ्याचे काम करत होते.

तोच शेजारील वंजारी परिवारातील आरोपी आकाश व विकास हे आपल्या नवीन घरातील शौचालयाचे पाईप जखमी राजेश कुथेच्या जागेतून भूमिगत करत होते. त्याबद्दल हटकले असता विकास जखमीवर धावून गेला. त्यात त्याने खिश्यातील धारधार सुरी काढून राजेशच्या डाव्या पोटावर व मानेवर उजव्या बाजूला व हातावर सपासप वार केले. त्यात राजेश रक्तबंबाळ झाला. कृष्णा मदतीला धाऊन जातच आरोपींचा मोठा भाऊ आकाश हातात हत्यार घेऊन जखमीच्या दिशेने धावत सुटला. आकाशने राजेशच्या पाठीवर व डाव्या हाताच्या काखेत चाकूने वार केले.

दरम्यान आरोपी भावंडांचे आई-वडील सुनीता व रमेश हातात काठ्या घेऊन जखमी तथा त्याचा भाऊ कृष्णावर हल्ला चढवला. त्यात राजेश बेशुद्ध होऊन जमिनीवर कोसळला. कृष्णाने बचावाकरीता हंबरडा फोडताच आरोपी वंजारी परिवाराने घटना स्थळावरून पळ काढला. त्याच रक्तबंबाळ बेशुद्ध भावाला कृष्णाने स्थानिकांच्या मदतीने उपचारार्थ घरच्या चारचाकीने तुमसर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. घटनेची माहिती तुमसर पोलिसांना देण्यात आली. तोपर्यंत राजेशची परिस्थिती नाजूक असल्याने त्याला डॉक्टरांनी भंडारा हलविले.

गुन्हा नोंद करून आरोपींना अटक

शुल्लक कारणावरून राजेशला चाकू, काठीने वार करून जखमी करणाºया आरोपी वंजारी परिवारातील भाऊ आकाश वंजारी, विकास वंजारी, वडील रमेश वंजारी व आई सुनीता वंजारी यांचेविरुद्ध कृष्णा वंजारी याचे तक्रारीवरून भादंवी कलम ३०७, ३४ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असून तुमसर पोलीसांनी आरोपींना अटक केल्याची माहिती मिळाली आहे.

जखमीची परिस्थिती नाजूक

शौचालयाचे पाईप टाकण्याच्या वादातून चाकूहल्ल्यात राजेश गंभीर जखमी झाला आहे. त्यात डॉक्टरांनी सांगितल्यानुसार पोटावर व मानेवर पडलेल्या घावाने राजेशच्या संवेदनशील गणल्या जाणाºया आंतरिक अवयवांना क्षतिग्रस्त केले आहे. त्यामुळे पुढील ४८ तास जखमीकरीता नाजूक असल्याचे कळले आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *