आनंदाचा शिधा मिळाल्याबददल लाभार्थ्याची कृतज्ञता

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागामार्फत राबविण्यात येणाºया विविध योजनांच्या लाभार्थ्यांशी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आॅनलाईन संवाद साधला. यावेळी अन्न नागरी पुरवठा विभागाचे मंत्री रविंद्र चव्हाण, सचिव विजय वाघमारे यासह भंडारा जिल्ह्यातील निवडक लाभार्थी जिल्हाधिकारी कार्यालयातून आॅनलाईन सहभागी झाले होते. यावेळी जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर, जिल्हा पुरवठा अधिकारी नरेश वंजारी, जिल्हा पणन अधिकारी अजय बिसने यासह ५० लाभार्थी सहभागी झाले होते. या आॅनलाईन संवादाच्या सुरूवातीला अन्न नागरी पुरवठा विभागाचे मंत्री रविंद्र चव्हाण यांनी आनंदाचा शिधा, शिवभोजन यासह अन्य विषयावर भुमिका मांडली. आनंदाचा शिधा मिळाला असून त्यातील जिन्नस चांगल्या दर्जाचे असल्याचे लाभार्थ्यानी सांगितले. आनंदाचा शिधा संचाचे वितरण, राज्यातील धान उत्पादक शेतकºयांना प्रोत्साहनपर राशी (बोनस), शिवभोजन थाळी या योजनबाबत मुख्यमंत्री श्री.शिंदे यांनी संवाद साधला. त्यात त्यांनी धान उत्पादकांना बोनस मिळाल्याबाबत विचारणा केली असता लाभाथ्यार्नी याबाबत समाधाना व्यक्त केले.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *