अनोळखी इसमाचा जळालेल्या स्थितीत मृतदेह आढळला

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी लाखनी : गडेगाव वन विभाग लाकूड आगाराच्या जंगल परिसरात एक एका अनोळखी इसमाचा मृतदेह जळालेल्या स्थितीत आढळून आल्याने एकच खळबळ आली आहे सदर घटना ६ एप्रिल ला घडल्याच्या अंदाज पोलिसांनी वर्तवला असून आज गुरुवारी (ता. १३) ला पोलीस पाटील कार्तिक राजाराम शेंडे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार अपराध क्र. ११४/२०२३ चे कलम ३०२,२०१ नुसार अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस अधीक्षक सुशांत सिंह, उपविभाग साकोली यांच्याकडे असून घटने संदर्भात काही माहिती मिळाल्यास पोलीस स्टेशन लाखनी ला कळविण्याची विनंती त्यांनी प्रसिद्धी पत्रकार द्वारे कळविली आहे. सदर मृतदेह नागपूर येथील वैद्यकीय महाविद्यालयात पाठविण्यात आले असून घटने संदर्भात परिसरात अनेक तर्क- वितर्क लावले जात आहेत.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *