सर्पदंशाने दोन सख्ख्या भावंडाचा मृत्यू

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी मोहाडी :- घरात झोपलेल्या दोन सख्या भावांचा सर्पदंशाने मृत्यू झाल्याची दुदैवी ँघटना मोहाडी तालुक्यातील देव्हाडा खुर्द (एलोरा पेपर मील ) येथे रविवारला रात्री ९ .३० वा .घडली . सुशील बलवीर डोंगरे वय ८ वर्ष व उत्कर्ष बलवीर डोंगरे वय ११ वर्ष असे मृतक भावंडाचे नाव आहेत . या घटनेची माहीती होताच शिक्षण विभागाच्या अधिकाºयांनी देव्हाडा खुर्द येथे धाव घेतली . दि. ११ सप्टेंबरला रविवारी रात्रि दोघेही भाऊ जेवण करुन एकाच खाटेवर झोपी गेले होते .रात्री मागच्या दाराने आलेला विषारी साप घरात वेळू फाट्यावर चढला आणी वरून तो झोपलेल्या खाटेवर पडला त्यावेळी मृलांना अंगावर काहीतरी पडल्याचा भास झाल्याने दचकले , त्याच वेळेस त्या विषारी सापाने त्या भावंडाचा चावा घेतला . सापाने दंश केल्याचे माहीत होताच घरातील लोकांनी प्रथम तुमसर येथील शासकीय रूग्णालयात नेले . व नंतर भंडारा येथीला जिल्हा सामान्य रूग्णालयात नेत असतांना वरठी जवळसुशीलचा मृत्यू झाला .तर दुसरा भाऊ उत्कर्ष याच्यावर भंडारा येथे काही वेळ उपचार केल्या नंतर त्याला नागपुर येथे मेडिकल कॉलेज येथे नेण्यात आले. तिथे रात्र भर उपचारा नंतर सोमवारला सकाळी ९ .३० वाजता त्याचा मृत्यू झाला . सुशील हा दुसºया तर उत्कर्ष पाचव्या वर्गात शिकत होता . बलवीर डोंगरे यांना ही दोनच मूल असल्याने त्यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला. या ह्रदयद्रावक घटनेमुळे देव्हाडा खुर्द गावात शोककळा पसरली आहे . घटनेची नोंद करडी पोलिसानी केली आहे. शवविच्छेदना नंतर दोन्ही भावंडावर गावातील स्मशान भूमीत अंतीम संस्कार करण्यात आले .या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *