सिसिटिव्ही कॅमेरे व सिग्नल ची व्यवस्था करा!

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : भंडारा शहरात सि. सि. टि. व्ही कॅमेरे व ट्रॉफिक सिग्नलची व्यवस्था करण्यात यावी अशी मागणीभंडारा शहर कांग्रेस कमेटी तर्फे जिल्ह्याचे पोलिस अधिक्षक लोहीत मतानी यांना देण्यात आलेल्या निवेदनातुन करण्यात आली आहे भंडारा शहरात मागिल तीन- चार वर्षात छोट्या मोठ्या अपराधावर नियंत्रण असावे, कुठे अपराध घडत असेल किंवा घडला असेल ती परिस्थिति जाणुन घेण्यासाठी एकुन बहात्तर ( ७२ ) सिसिटीव्ही कॅमेरे लावण्यात आले. त्यापैकी सध्या परिस्थितीत बाविस ( २२ ) कॅमेरे सुरु आहे. बाकी कॅमेरे बंद अवस्थेत असुन अशा परिस्थितीत शहरात एखाद्या ठिकाणी अनुचित प्रकार घडला तर ते शासनाच्या लक्षात येत नाही. भंडारा शहरात दोन ते तिन महापुरूषांचे मोठे स्मारक असुन यात त्रिमुर्ती चौकात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, शुक्रवारी वार्डातील शिवाजी चौकात छत्रपती शिवाजी महाराज, तथा गांधी चौकात राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे स्मारक असुन या ठिकाणी सि. सी. टी. व्हि कॅमेरे उपलब्ध नाही.

त्यामुळे भविष्यात काही अनुचित प्रकार घडु शकतो. त्यामुळे ह्या सर्व परिस्तीथीला लक्षात घेऊन भंडारा शहरात लवकरात लवकर सि. सी. टि. व्ही कॅमेरे उपलब्ध करून देण्यात यावे, त्याचप्रमाने भंडारा शहर हा लहान शहर असुन शहरात मोठ्या प्रमाणात वाहतुक होत असते. शहरात सिग्नल नसल्यामुळे सुसाट वेगाने छोट्या मोठ्या गाड्या धावत असतात. अशा वेगाने धावणा-या गाड्यामुळे शहरात अपघाताची शक्यता वाढली आहे. यामुळे भंडारा शहरात लवकरात लवकर ट्राफिक सिग्नलची व्यवस्था करा अशा आशयाचे निवेदन भंडारा शहर कांग्रेस कमेटी चे अध्यक्ष प्रशांत देशकर, महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस कमेटी सांस्कृतिक विभागाचे सरचिटणीस महेंद्र वाहाणे, भटक्या जमाती जिल्हा अध्यक्ष अजय मोहनकर, जिल्हा महासचिव सोहेल अहमद, अजय गडकरी, सोनु कोटवाणी, इंटकचे जिल्हा उपाध्यक्ष जिवन भजनकर, शहर उपाध्यक्ष मेहमुद खान, कमल साठवने युवक भंडारा विधानसभा अध्यक्ष आकाश ठवकर, युवक कांग्रेस शहर उपाध्यक्ष अथर्व भट आदि उपस्थित होते.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.