भारतीय अर्थव्यवस्था मजबुत करण्यासाठी स्थानिक दुकांदारांकडूनच खरेदी करावे- शिशुपाल पटले

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी तुमसर : भारताचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिवसाच्या निमित्त भाजपा शहर व ग्रामीण तर्फे राष्ट्रानेता ते राष्ट्रपिता सेवा पंढरवाडा या पर्वावर भाजप कार्यालय तुमसर येथे दि.२२ सप्टेंबर रोजी ‘वोकल फॉर लोकल’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ‘कोरोना सारख्या महामारीच्या वेळी लॉकडाऊन असत्तांनी व आॅनलाइन सेवा बंद असत्तांनी आपल्या जीवाची पर्वा न करता सर्वांना सेवा देणारा हाच स्थानिक दुकानदार होता,हे लक्षात ठेवून व भारतीय अर्थव्येवस्था मजबूत करण्यासाठी *स्थानिक दुकानदारांकडूनच सामान खरेदी करावे, स्थानिक उत्पादनाला महत्व देऊन त्यांचेकडून खरेदी करावे . केवळ खरेदीच करू नये तर त्यांचा गवार्ने प्रचारही करावा. आॅन लाईन खरेदी करू नये. ’ हा संदेश देण्यासाठी ‘वोकल फॉर लोकल’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.त्याठिकाणी लोकल दुकानदारांनी विक्रीसाठी आपले स्टोल लावले होते. भाजपच्या शेकळो कार्यकर्त्यांनी त्यांचेकडून सामान खरेदी केले.

या कार्यक्रमाचे उद्घाटन माजी खासदार शिशुपालजी पटले यांचे हस्ते झाले. या वेळी प्रमुख उपस्थिती माजी नगराध्यक्ष प्रदीप पडोळे,मुन्नाभाऊ पुंडे,शहर अध्यक्ष पंकज बालपांडे, ग्रामीण अध्यक्ष कांशीराम तेंभरे आयोजक कुंदाताई वैद्य, गीताताई कोंडेवार, हरेन्द्र रहांगडाले,भगवान चांदेवार, बंडूभाऊ बनकर, दिलीपभाऊ सार्वे, राजकुमार मरठे, सचिन बोपचे, कल्याणी भुरे, आशिष कुकडे, बाबूजी ठवकर, योगेश रंगवाणी ,प्रियंका कटरे,प्रीती मलेवार,आदिती कालबांधे,अमरीश सानेकर, रजनीश लांजेवार, आनंद रोचवानी,पवन पाटील, राजेंद्र पिकलमुंडे,संतोष वहिले, अशोक ठाकूर, रूपा सोनेवाने, शैलेश मेश्राम, मनमोहन पचोली, संदीप कटकवर,कृष्णा पाटील, अखिल चकोले,शिला डोये, अर्चना भुरे,राजू भगत,अरविंद पटले, दिनेश ढोके, चरणदास ठाकरे,शुभम मिश्रा, नितीन धांडे, नितीन पटले,विना धुर्वे, ममता गजभिये,प्रामुख्याने उपस्थित होते.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *