शांतीवन बुद्ध विहार चिचाळ येथे ८ व्या वर्धापन दिनानिमित्त दोन दिवसीय भव्य बुद्ध धम्म मेळावा

भंडारा पत्रिका/वार्ताहर अड्याळ : पवनी तालुक्यातील शांतीवन बुद्ध विहार पाथरी (चिचाळ) येथे महाबोधी उपासक संघ नागपूरच्या वतीने दोन दिवसीय भव्य बुद्ध धम्म मेळावा दि. २७ व २८ फेब्रुवारी २०२३ ला आयोजित करण्यात आलेला होता. दि. २७ फेब्रुवारीला सायंकाळी ९ वाजता शांतीवन बुद्ध विहारात धम्म पूजापाठ व महापवित्राण कार्यक्रम घेण्यात आला व त्यानंतर २८ फेब्रुवारीला सकाळी ९ वाजेपासून ११.३० वाजेपर्यंत शांतीवन बुद्ध विहारात सकाळी पंचशील ध्वजाचे ध्वजारोहण, महाकारूणी तथागत गौतम बुद्ध, शिवली बोधी, सम्राट अशोक, बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले. त्याचप्रमाणे संपूर्ण भिक्षू संघाचे उपस्थितीत बुद्ध धम्म संघ वंदना घेण्यात आली व त्यानंतर शांतरक्षित महाथेरो आणि भिक्षू संघ यांचे बुद्ध धम्मावर आधारित धम्म प्रवचन संपूर्ण बुद्ध उपासक उपासिका यांना देण्यात आले. यावेळी भदंत शांत रक्षित महाथेरो नागपूर, भंते प्रज्ञा नागपूर सोमनाळा, थेरो भंते धम्मप्रिय नागपूर, भंते धम्मानंद मुंबई, भंते सूर्य ज्योती नागपूर, भंते संघानंद पालांदूर, भंते बुद्धपाल शांतीनगर बुद्ध विहार, भिक्षुनी सुजाता, धम्मदिना मातेरी नागपूर, भिक्षुनी धम्मासुद्धा नागपूर, भिक्षुनी अनुमा, सुकेसनी नागपूर, श्रामनेरी सुमेधा नागपुर यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते.
त्याचप्रमाणे धम्मचारी श्रमनमित्र पंचशील नगर नागपूर यांनी सुद्धा बुद्ध प्रवचन जळत्या घरातून बाहेर निघणे यावर मार्गदर्शन केले. सायंकाळी ७ वाजता प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत कर्मयोगी संत गाडगेबाबा व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पूणार्कृती पुतळ्याचे अनावरण सप्त खंजिरी वादक सत्यपाल महाराज यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी अखिल भारतीय ओबीसी बहुजन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष व माजी खासदार खुशाल बोपचे प्रामुख्याने उपस्थित होते. प्रमुख अतिथी म्हणून संपादक व पत्रकार सेवा संघटनेचे राज्य सरचिटणीस संजीव भांबोरे, माजी जिल्हा परिषद सदस्य रेखा भुसारी, धम्म प्रचारक दिलीप घोडके, पत्रकार तथा सामाजिक कार्यकर्ते पंकज वानखेडे, धम्मरक्षित जीवनबोधी बौद्ध, जीवनबोधी बौद्ध, सत्यफुला जीवनबोधी बौद्ध, सामाजिक कार्यकर्ते मनोज वैरागडे आदी धम्म विचार मंचकावर प्रामुख्याने उपस्थित होते.
यावेळी सत्यपाल महाराजांनी उद्घाटनपर मार्गदर्शन करताना सांगितले की, बुद्ध, कबीर, फुले, शाहू, माई रमाई, माँ जिजाऊ, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, सम्राट अशोक, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर, संत गाडगेबाबा, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, संत तुकाराम यांचे विचार अंगीकृत करून आपला विकास साधावा यावेळी त्यांनी प्रामुख्याने सांगितले. त्याचप्रमाणे अखिल भारतीय ओबीसी बहुजन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष व माजीखासदार डॉ. खुशाल बोपचे यांनी अध्यक्ष पदावरून मार्गदर्शन करताना सांगितले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या राज्यघटनेमुळेच या देशातील सर्व जाती धर्मातील लोक सुरक्षित आहेत. त्याचप्रमाणे आपले हक्क आणि अधिकार सुरक्षित आहेत. परंतु आज सुद्धा ओबीसी समाज आपल्या अधिकारापासून वंचित आहे. त्यामुळे ओबीसी समाजाने आपला शत्रू कोण व मित्र कोण हे ओळखायला पाहिजे असे त्यांनी आवर्जून सांगितले. कार्यक्रम यशस्वी करण्याकरता मूर्तिकार राजकुमार वाहने, आशिष मेश्राम, सामाजिक कार्यकर्ते कुलदीप गंधे, ललित मेश्राम, गुलाब गोडसे, गंगाधर गजभिये, विनायक ढोके, जयेश मोटघरे, खेमराज चौरे, सुरेश उईके, मलेस मेश्राम, रामरावजी गाडेकर, कृष्णाजी बोरकर, सूर्यभान शेंडे, शकुंतलाताई गोडबोले, मोटघरेताई, नागेश मेश्राम, बी.जी. दामले, नामदेव काणेकर, सुरेंद्रसिंग बुंदेले, ज्योती उके यांनी सहकार्य केले.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *