ट्रक अपघातात मजूर जागी ठार

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी लाखनी : आज लाखनी पोलीस स्टेशन अंतर्गत राष्ट्रीय महामार्गावर पिंपळगाव टोली जवळ पटाच्या दाणीजवळ महामार्गाच्या दुभाजकावर झाडे लावणे व झाडांची कटिंग करणे हे अशोका हायवे कंपनीच्या तर्फे काम सुरू होते. यादरम्यान मागेहून भरधाव वेगाने येणाºया एका ट्रकने समोर उभे असलेल्या ट्रॅक्टरला जोरदार धडक दिल्याने झाडे लावण्याच्या कामात व्यस्त असलेला मजूर जागीच ठार झाला. सविस्तर वृत्त असे की लाखनी पोलीस स्टेशन अंतर्गत पिंपळगाव टोली जवळ महामार्गावरील डिव्हायडरवर झाडे कापणे व त्याची छाटणी करणे आणि झाडे लावणे हे काम अशोका हायवे तर्फे मजुरांच्या मार्फत सुरू होते. या कामावर एम एच ३६ डी ८०९२ क्रमांकाची ट्रॅक्टर साकोली च्या दिशेने साहित्य घेऊन उभा होता. या ट्रॅक्टर मधील काही साहित्य बाहेर काढत असताना नागपूरकडून रायपूरकडे भरधाव वेगाने जाणाºया ट्रक क्रमांक सी.जी. ०८ एल ०८२९ च्या चालकाने उभ्या असलेल्या ट्रॅक्टरला जोरदार धडक दिली. या धडकेत ट्रॅक्टर मधून अतुल हरिभाऊ झिंगरे (२७) राहणार खैरी या हायवे वर काम करणाºया मजुराचा जागीच मृत्यू झाला. उत्तरीय तपासणी करीता लाखनी पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनगृहात पाठविले आहे. पोलिसांनी ट्रक चालका विरोधात गुन्हा दाखल करून पुढील तपास ठाणेदार व सहकारी करीत आहेत.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *