सुनील केदार यांना पाच वर्षांचा सश्रम कारावास

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी नागपूर : नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील बहुचर्चित १५० कोटी रुपयांच्या सरकारी रोखे खरेदी घोटाळा प्रकरणी मुख्य आरोपी माजी मंत्री, आमदार सुनील केदार यांच्यासह सहा आरोपींना विविध गुन्ह्यांसाठी कमाल पाच वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. तसेच, प्रत्येकाला १२ लाख ५० हजार रुपये दंडही ठोठावण्यात आला आहे. तब्बल २१ वर्षांनंतर अतिरिक्त मुख्य न्याय दंडाधिकारी ज्योती पेखळे-पूरकर यांनी या घोटाळ्याचा निकाल शुक्रवारी जाहीर केला. शिक्षा झालेल्या इतर पाच आरोपींमध्ये बँकेचे तत्कालीन महाव्यवस्थापक अशोक नामदेवचौधरी, रोखे दलाल केतन कांतीलाल सेठ, सुबोध चंदादयाल भंडारी, नंदकिशोर शंकरलाल त्रिवेदी (सर्व मुंबई) व अमित सीतापती वर्मा (अहमदाबाद) यांचा समावेश आहे. हा घोटाळा झाला त्यावेळी केदार बँकेचे अध्यक्ष होते.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *