अपघातात दोघांचा मृत्यू, एक गंभीर जखमी

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी देवरी : देवरी ते चिचगड मार्गावरील भाटिया पेट्रोल पंपासमोर दोन दुचाकीच्या अमोरासमोर झालेल्या धडकेत एकाचा जागीच तर एकाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाल्याची दुदैर्वी घटना मंगळवार, २५ एप्रील रोजी रात्री ८.३० वाजताच्या सुमारास घडली. या अपघातात दुचाकीवरील एक महिला गंभीर जखमी झाली. हितेश श्रीवास व मिर्झा अलिम बेग अशी मृतकांची नावे आहेत. हितेश संतोष श्रीवास (२५) रा.परसटोला/देवरी व मिर्झा अलिम बेग (३५) रा बालाघाट यांचे त्यांच्या ताब्यातील दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने दोन्ही दुचाकी आमोरासमोर धडकल्या. यात हितेश श्रीवासचा जागीच मृत्यू झाला. तर मिर्झा अलिम बेग याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या अपघातात मिझा अलिम बेगच्या दुचाकीवरील मागे बसलेली त्यांची पत्नी शाहिल मिर्जा बेग ही गंभीर जखमी झाली. तिच्यावर ग्रामीन रुग्णालयात दाखल उपचार सुरु आहेत.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *