अवैधरित्या गांजा बाळगणाºया चौघांना अटक

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी गोंदिया : स्थानिक गुन्हे शाखा पोलिस पथकाने तालुक्यातील तुमखेडा बुज. येथे सापळा गांजाची अवैधरित्या वाहतूक करणा-या वाहनावर कारवाई केली. या कारवाईत चौघांना अटक करुन त्यांच्याजवळून ३ किलो गांजा, वाहन असा २ लक्ष ९५ हजार ३५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक फौजदार अर्जुन कावळे यांना काही इसम चारचाकी वाहनाने गोरेगाव-देवरी मार्गे गोंदिया येथे गांजा विक्रीसाठी आणत असल्याची गोपनीय माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिस पथकाने तुमखेडा बुज. येथे पंच सोबत घेऊन सापळा रचला. यातंर्गत सीजी १२, डी ९९८५ क्रमांकाच्या वाहनाची तपासणी केली असता प्लास्टिक पॉलीथीनने पॅकिंग केलेले ६६ हजार रुपये किमतीचे ३ किलो वजनाचे गांजाचे ३ पुडे आढळला.

याप्रकरणी अजय नंदकिशोर पंधराम (२१, रा. भागी)ख् रुषभ मारुती बेहार (२४, देवरी), विनोद रामकुमार (२३, रा. सावली) व थमेश्वर उमराज पटले (२५, रा.हरदोली) यांना अटक केली असून गोंदिया ग्रामीण पोलिस ठाण्यात आरोपीविरुद्ध कलम ८ (क), २०0, २९ एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई सहायक पोलिस निरीक्षक विजय शिंदे, पोलिस उपनिरीक्षक महेश विघ्नें, सहायक फौजदार अर्जुन कावळे, पोलिस हवालदार राजेंद्र मिश्रा, चित्तरंजन कोडापे, इंद्रजीत बिसेन, चेतन पटले, महेश मेहर, प्रकाश गायधने, पोलिस शिपाई संतोष केदार, लक्ष्मण बंजार, मुरलीधर पांडे यांनी केली.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *