जिल्ह्यात ११ व २१ आॅक्टोंबर २०२२ ला ‘गप्पी मासे सोडणे’ दिवसाचे आयोजन

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी गोंदिया : राष्ट्रीय कीटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत विविध कीटकजन्य आजार जसे हिवताप, डेंग्यू, चिकनगुनिया, चंडीपुरा, जे.ई. व हत्तीरोग इत्यादी आजाराबाबत जनतेमध्ये जागृती निर्माण करून त्यांच्या प्रतिरोध उपाययोजनांच्या अंमलबजावणी मध्ये त्यांचा सक्रिय सहभाग प्राप्त करून घेण्याच्या दृष्टीने दिनांक ११ आॅक्टोंबर २०२२ रोजी व त्याच्या १० दिवसानंतर दि. २१ आॅक्टोंबर २०२२ रोजी जिह्यातील कायम स्वरूपी व तात्पुरत्या डासोत्पती स्थांनामध्ये गप्पी मासे सोडणे दिवस साजरा करण्याचा नाविन्यपुर्वक उपक्रम डॉ. वेदप्रकाश चौरागडे जिल्हा हिवताप अधिकारी गोंदिया यांनी साजरा करण्याचे ठरविले आहे.या जनजागरण मोहिमेमध्ये गाव तसेच शहर पातळीवर डासोत्पती स्थांनामध्ये गप्पी मासे सोडून गप्पी माशांचे कीटकजन्य आजार नियंत्रण मिळवण्याच्या दृष्टीने त्यांचे महत्त्व व प्रात्यक्षिक योग्य त्या माध्यमाद्वारे लोकांमध्ये जनजागृती निर्माण करणे आहे. डासोत्पती प्रतिबंध उपायोजनांमधील लोकसहभाग वाढवणे हा या मोहिमेचा प्रमुख उद्देश आहे. जिल्हा, तालुका, प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय तसेच गाव पातळीवर लोकप्रतिनिधी, महिला मंडळ, स्वयंसेवी संस्था यांचे सहभागातून डासोत्पती स्थांनामध्ये गप्पी मासे सोडण्याची नियोजन करण्यात येणार आहे. गावपातळीवर ग्रामसभेमध्ये माहिती देणे, गावोगावी दवंडीच्या मार्फत लोकांमध्ये जनगजाग्रुती करणे.

सदर मोहीम यशस्वी होण्याच्या दृष्टीनेआपल्या कार्यकार्य क्षेत्रातील विविध खात्यांच्या अधिकारी, आरोग्य विभागाच्या विविध शाखातील अधिकारी व कर्मचारी तसेच विविध स्तरावरील पदाधिकारी व स्वयंसेवी संस्था यांची सहकार्य घेण्यात येणार आहे. सामुदायिक शाळा, महाविद्यालय, विविध कार्यालये, ग्रामपंचायत, तहसील कार्यालये, उपविभागीय अधिकारी कार्यालये, पंचायत समिती कार्यालये, बँका यांनी सुद्धा सहभागी होण्याचे आवाहन हिवताप विभागामार्फत करण्यात आलेले आहे. बस स्थानक, बाजार, रेल्वे स्टेशन अशा गर्दीच्या ठिकाणी असलेल्या डासोत्पती स्थानकांमध्ये गप्पी मासे सोडून लोकांमध्ये जनजागृती करण्यात येणार आहे. डास उत्पत्ती नष्ट करणे, डासांची पैदास पाण्यात होत असल्याने अशा जागांमध्ये डबकी गटारे इत्यादी पाण्याचा निचरा केल्याने व मातीने अशा जागा बुजून टाकल्यास डासांची पैदास होत नाही या उपायांमध्ये स्त्रोत नष्ट करणे असे म्हणतात. डासांचे नियंत्रण करताना डासांची पैदास होणारी स्थाने उदाहरणार्थ उघडी गटारे, डबकी आणि साचलेल्या पाणी वाहते करणे व शक्य नसल्यास गप्पी मासे डबक्यात किंवा वापरात नसल्या विहिरीत सोडता येतात.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.