डॉ.परिणय फुके यांच्या प्रयत्नांमुळे आता ‘सीएमआर’ अंतर्गत तांदूळ वाटपाचे अधिकार जिल्हाधिका-यांना

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : अलीकडेच सार्वजनिक वितरण प्रणाली (सीएमआर) अंतर्गत येणाºया तक्रारींच्या आधारे माजी राज्यमंत्री तथा भंडारागोंदिया जिल्ह्याचे माजी पालकमंत्री डॉ. परिणय फुके यांनी नुकतेच मुंबईत राज्याचे अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री रवींद्र चौहान यांची भेट घेऊन शासकीय आदेशात अंशत: बदल करून आणि सीएमआर योजनेंतर्गत होणारी गैरसोय दूर करून जिल्हा स्तरावर तांदूळ वितरणाचे अधिकार देण्याची विनंती केली. याबाबतचे पत्र देताना माजी मंत्री डॉ.परिणय फुके यांनी अन्न व नागरी पुरवठा मंत्री रवींद्र चौहान यांना या प्रकरणाची माहिती दिली व ते म्हणाले की, सार्वजनिक वितरण प्रणाली (सीएमआर) योजनेअंतर्गत मंत्रालयाने जारी केलेल्या सध्याच्या आदेशानुसार पुरवठा जिल्ह्यातील अन्न आपूर्ति विभागांकडून मागणी आल्यानंतर मंत्रालयाच्या आदेशात नमूदकेलेल्या विशिष्ट गोदामांमधून तांदूळ असमानपणे उचलला जातो. या आदेशान्वये सीएमआर अंतर्गत ज्या गोदामांमधून तांदूळ उचलण्याचा उल्लेख करण्यात आला आहे, त्या गोदामांमध्ये ही व्यवस्था असमान होत आहे. गैरसोयी निर्माण झाल्यामुळे तांदूळ उचल व वाहतूक करण्यास विलंब होत असून, त्याचा परिणाम धान्य वितरणावर होत आहे.

श्री.फुके म्हणाले, मंत्रालयाच्या वरीलआदेशात अंशत: बदल करून गोदामांचे नाव न नमूद करता, तांदूळ पुरवठ्याचे अधिकार जिल्हास्तरावरील जिल्हाधिकारी किंवा जिल्हा पुरवठा अधिकारी यांना दिल्यास गैरसोय टाळता येईल. डॉ.परिणय फुके यांनी मांडलेल्या या बाबीची तत्काळ दखल घेत अन्न पुरवठा मंत्री रवींद्र चौहान यांनी या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत (सीएमआर) वितरण करण्याचा निर्णय घेऊन अन्न नागरी पुरवठा सचिव व जिल्हाधिकारी यांना आदेश दिले. या आदेशान्वये आता मंत्रालय स्तरावर ज्या विशिष्ट गोदामातून तांदूळ उचलण्याचा उल्लेख करण्यात आला होता, ते बदलून जिल्हाधिकारी स्तरावर तांदूळ उचलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. डॉ.परिणय फुके यांनी या दिशेने घेतलेल्या सकारात्मक पुढाकारामुळे सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील मोठी गैरसोय सुधारून गती येईल.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *