जिल्ह्यात वाजत गाजत, नाचत बाप्पाचे आगमन

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : मांगल्य, पावित्र्य आणि उत्साहाचे प्रतीक असलेल्या विघ्नहर्त्या गणरायाचे आज अगदी भक्ती भावात, आनंदात व जल्लोषात आगमन झाले. सार्वजनिक मंडळासह व प्रत्येक घरात गणरायाची विधीवत पूजा, अर्चा करुन स्थापना करण्यात आली. यावेळी भक्तांचा उत्साह ओसंडून वाहत होता. विघ्नहर्त्या बाप्पाचा १० दिवसाचा मुक्काम राहणार असून, या दरम्यान गणेश मंडळांनी सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. लाडक्या बाप्पाची सर्वच सार्वजनिक गणेश मंडळांनी उत्साहात तयारी केली. लहानापासून जेष्ठापर्यंत या उत्सवाचा उत्साह दिसून आाला. जिल्ह्यातील विविध बाजारपेठेत लहान मोठ्या गणेश मंडळांनी गणेश मुर्तीसह साहित्य खरेदीसाठी गर्दी केली होती. सकाळपासूनच भक्तांचा उत्साह दिसून आला.शहरातील दसरा मैदान येथे गणेश मुर्ती विक्रीकरीता विशेष सोय करण्यात आली होती.

यासह शहरातील गांधी चौक ते मोठा बाजार परिसर मार्गावर श्रीच्या मूर्तीची दुकाने तसेच पुजेच्या साहित्याची दुकाने थाटण्यात आली होती. वाढत असलेल्या महागाईचा परिणाम या उत्सवावरही दिसुन येत आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा गणेश मुर्ती व सजावटीच्या साहित्यात बºयापैकी वाढ झाली असली तरी उत्सवाचा आनंद कमी झाल नसल्याचे आज दिसुन आले.

पुरातन गणेश मंदीरात दर्शनासाठी आज भक्तांच्या रांगा दिसुन आल्या. घरगुती गणेशोत्सवासाठी आज बाजारात भक्तांची मोठी गर्दी जमली होती. बाप्पांना आपल्या घरी घेऊन जाण्यासाठी चिमुकल्यांपासून जेष्ठापर्यंत सर्वांनी अगदी नाचत व वाजत गाजत जल्लोष साजरा केला. दुचाकीवर, चारचाकी वाहन, आॅटोमधून, रिक्षामधून, सायकलवर, डोक्यावर असे बाप्पांना आपल्या घरी आणले.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *