अ‍ॅल्युमिनीयम तारांची चोरी करणाºया दोघांना अटक

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : उच्च दाबाचे अ‍ॅल्युमिनियम तारांची चोरी करणाºया दोघांना भंडारा स्थागुशा विभागाच्या अधिकाºयांनी अटक केली. पोलीसांनी आरोपींच्या ताब्यातुन अ‍ॅल्युमिनिअमचे तार व मोटारसायकल असा एकुण २ लाख ७५ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. विशाल ललीदास दिघोरे वय २६, धंदा शेती व विनोद पांडुरंग दिघोरे वय ३३ वर्षे, धंदा शेती दोन्ही रा. नान्होरी ता. ब्रम्हपुरी जिल्हा चंद्रपुर अशी आरोपींची नावे आहेत. भंडारा स्थागुशाचे पथक मोटरसायकल चोरीच्या गुन्हयातील आरोपींचा शोध घेण्यासाठी गस्त घालत असतांना दोन इसम मोटार सायकलने उच्च दाबाचे अ‍ॅल्युमिनीयमचे तार चोरी करून घेवून जात असल्याची माहिती स्थागुशाच्या अधिकाºयांना मिळाली.त्या आधारे स्थागुशाच्या पथकाने पवनी ते भुयार मार्गावर खबरेची शहानिशा करणेकामी गेले असता विशाल ललीदास दिघोरे वय २६, धंदा शेती व विनोद पांडु- रंग दिघोरे वय ३३ वर्षे, धंदा शेती दोन्ही रा. नान्होरी ता. ब्रम्हपुरी जिल्हा चंद्रपुर हे दोघही मोटारसायकलने अंदाजे १२०० किलो ३३ केव्ही उच्च दाब अ‍ॅल्युमिनीयम तार, किंमत २लाख ४० हजार रुपए याची वाहतुक करतांना मिळुन आले.

पोलीसांनी त्यांची अ‍ॅल्युमिनिअम तारांविषयी चौकशी केली असता त्यांनी सदर तार चोरी केल्याचे स्पष्ट झाले. पोलीसांनी दोन्ही आरोपींना ताब्यात घेवुन त्यांच्याकडील अ‍ॅल्यमिनिअम तार व हिरो कंपनीची पॅशन प्रो मोटारसायकल क्र.एम.एच.३४ -५६६९ असा एकुण २ लाख ७५ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करीत दोन्ही अरोपींना पुढील तपासा करीता पवनी पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक लोहित मतानी, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनात स्थागुशा पो.नि. नितीन चिंचोळकर, पो. हवा. प्रदीप डाहारे,पो. हवा. कैलास पटोले, पो.हवा. किषोर मेश्राम, पो.अ. सचिन देषमुख, पो.अं. कृणाल कडव, चापोना. आशिष तिवाडे यांनी केली.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *