धानाच चकार रखडल्यान सतप्त शतकºयाच आमदाराच्या घरासमोर ठिय्या आदोलन…

गोंदिया :- गोंदिया तालुक्यातील शेतकºयांचे ५ कोटी ७२ लक्ष रुपये थकीत चुकारे न मिळाल्याने अखेर संतप्त झालेल्या शेकडो शेतकºयांनी आज सोमवार २८ आॅगस्ट ला गोंदिया विधानसभा अपक्ष आमदार विनोद अग्रवाल यांच्या घरासमोर भर उन्हात ठिय्या आंदोनाला सुरू केलेला आहे. संतप्त शेतकºयांनी जोपर्यंत पैसे मिळणार नाही तोपर्यंत इथून उठणार नाही अशी भूमिका शेतकºयांनी घेतली आहे. धान उत्पादकांचा जिल्हा म्हणून ओळख असलेल्या गोंदिया जिल्ह्यामध्ये रब्बी हंगामातील शेकडो शेतकºयांचे चुकारे अद्यापही थकले आहेत. त्यामुळे शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडलेले आहेत. तीन महिन्यांपासून वारंवार जिल्हा पणन कार्यालयाच्या वतीने शेतकºयांना आश्वासन देण्यात येत आहेत. त्याच प्रमाणे जिल्हाधिकारी तसेच जन प्रतिनिधी कडे चक्करा मारत असल्याने शेतकरी त्रस्त झाले आहे.

मात्र अद्याप पर्यंत शेतकºयांचे ५ कोटी ७२ लक्ष रुपये थक्कीत चुकारे न मिळाल्याने अखेर संतप्त झालेल्या शेकडो शेतकºयांनी अपक्ष आमदारविनोद अग्रवाल यांच्या घरासमोर ठिय्या आंदोनाला सुरू केलेला आहे. जोपर्यंत पैसे मिळणार नाही तोपर्यंत इथून उठणार नाही अशी भूमिका शेतकºयांनी घेतली आहे. यावेळी आमदार विनोद अग्रवाल यांनी शेतकºयांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र शेतकरी आमदारांची कुठलीही गोष्ट ऐकायच्या मानसिकतेत दिसत नाहीत. अनुचित प्रकार घडू नये म्हणून आमदारांच्या कार्यालया बाहेर पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. या प्रसंगी आपल्या घरा समोर आ. विनोद अग्रवाल, बाजार समिती संचालक पप्पू पटले आदि उपस्थित आहेत. पोलीस उपविभागीय अधिकारी ताजने, शहर पोलीस निरीक्षक सूर्यवंशी प्रकरणावर लक्ष ठेऊन आहेत. मोठ्या संख्येने पोलीस ताफा घटनास्थळी लावण्यात आला आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *