कृउबास निवडणूकीत ८४५१ मतदार करणार ६७ संचालकांच्या भाग्याचा फैसला

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : जिल्ह्यात भंडारा, पवनी, लाखांदूर, लाखनी आदी चार कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुकांचा प्रचार जोमात सुरू आहे. एकूण २८ केंद्रांवर २८ एप्रिल रोजी भंडारा व लाखनी येथे तर ३० एप्रिल रोजी पवनी व लाखांदूर येथे मतदान होणार आहे. एकूण ८४५१ मतदार ६७ संचालकांच्या भाग्याचा फैसला करणार आहेत. यानिमित्ताने मतदारांना देवदर्शनाचा लाभ मिळण्याचा योग आहे. जिल्ह्यात तीन बाजार समित्यांमध्ये प्रत्येकी १८ संचालकांसाठी निवडणुका अत्यंत उमेदवार जीवाचे रान करीत गावोगावी हिंडत आहेत. मतदारांच्या थेट घरी भेट देण्याचा एक कलमी कार्यक्रम सध्या सुरू आहे. या निवडणुकीत काँग्रेसने स्वतंत्र लढण्याचा निर्धार करीत ‘एकला चलो रे चा’ नारा दिला आहे.

राष्ट्रवादीने दगा दिल्याचा आरोप करीत प्रचारात रंगत भरली आहे. दुसरीकडे राष्ट्रवादीने भाजपा व शिंदे गटाशी हातमिळवणी करीत जिंकण्याच्या इराद्याने उमेदवार मैदानात उतरविले आहे. सहकार क्षेत्रातील निवडणुका राजकीय पक्षांच्या चिन्हांवर होत नसलेल्या सर्वच पक्षांच्या राजका- रण्यांनी निवडुकीत थेट हस्तक्षेप वाढविला आहे. जिल्हा प्रमुखांबरोबर आजीमाजी आमदारांनी प्रचाराची धुरा खांद्यावर घेतली आहे. जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, सरपंच तसेच राजकीय पक्षांच्या तालुका व जिल्हा पातळीवरील पदाधिकाºयांना प्रचाराच्या रिंगणात उतरविण्यात आले आहे. प्रचाराचे साहित्य, बॅनर, होर्डींग गावोगावी लागले आहेत. परंतु, परस्पर विरोधी विचारधारेच्या नेत्यांचे निवडणुकांतील मनोमिलन पाहून सर्वसामान्यांत चर्चांना वेग आला आहे चुरशीच्या व काट्याच्या होणार आहेत. लाखांदूरात एकूण १८ संचालकांपैकी ५ संचालक अविरोध निवडून आल्याने १३ संचालकांसाठी निवडणूक होत आहे. चारही बाजार समितीत एकेका मतदानासाठी

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *