भंडारा जि.प.च्या स्विकृत सदस्यपदी चंदु पिल्लारे

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : जिल्हा परिषदेच्या जलव्यवस्थापन पाणीपुरवठा व स्वच्छता समितीच्या स्वीकृत सदस्य पदी माजी जिल्हा परिषद सदस्य चंदु पिल्लारे यांची निवड करण्यात आली. जिप च्या सर्वसाधारण सभेत हे निमंत्रित सदस्य म्हणून काम करतील. जनसामान्यांच्या प्रश्नांचे अतिशय महत्वाचे विषय या समितीत हाताळले जातात. यावर जिल्ह्यातील टोकाचे कान्द्री जिप क्षेत्राचे माजी जिप. सदस्य चंद पिलारे यांची निवड झाल्याने त्यांच्या अनुभवाचा थेट फायदा होईल यात शंका नाही. त्यांच्या निवडीबद्दल माजी आमदार तथा विकास फाउंडेशन चे संस्थापक अध्यक्ष चरणभाऊ वाघमारे, जिप उपाध्यक्ष तथा अर्थ – नियोजन व बांधकाम सभापती संदीप ताले, कृषि व पशुसंवर्धन सभापती राजेश सेलोकर, यांनी अभिनंदन केले आहे. चंद पिलारे यांनी त्यांच्या नियुक्तीचे श्रेय काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आमदार नानाभाऊ पटोले,माजी आूमदार चरण भाऊ वाघमारे, जिप अध्यक्ष गंगाधर जिभकाटे, उपाध्यक्ष संदीप ताले, सभापती शिक्षण व आरोग्य रमेश पारधी, कृषि व पशुसंवर्धन सभापती राजेश सेलोकर, समाज कल्याण सभापती मदन रामटेके, महिला व बालकल्याण सभापती स्वातीताई वाघाये यांना दिले आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *