समीक्षा महिला बचत गटाला ई रिक्षाचे वाटप

तालुका प्रतिनिधी मोहाडी : उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनन्नोती अभियान पंचायत समिती मोहाडी अंतर्गत वरठी येथे बुधवार दि.१० मे २०२३ ला समीक्षा महिला बचत गट वरठी यांना मानव विकास अंतर्गत ई रिक्षा वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाला तुमसरमोहाडी विधानसभा क्षेत्राचे आमदार राजू माणिकरावजी कारेमोरे यांच्या शुभहस्ते उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी मोहाडी पंचायत समिती सभापती रितेश वासनिक तसेच माजी ग्रा.पं.सदस्य पवन रामटेके, अमित सुखदेवे, तालुका अभियान व्यवस्थापक सुनील पटले, प्रभाग समन्वयक चंद्रिकापुरे तसेच समीक्षा स्वयं सहायता समूह मधील सर्व महिला उपस्थित होते.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *