अती मद्य सेवनाने ईसमाचा मृत्यू

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी लाखांदुर : अति मद्यप्रासन केल्यानंतर घरी जाता आले नसल्यामुळे एका झुनका भाकर केंद्रात आराम करायला गेलेल्या एका मद्यपीचा अति मद्य सेवनामुळे मृत्यु झाल्याची घटना कृषी उत्पन्न बाजार समिती परीसरातील एका झुनका भाकर केंद्रात मंगळवारला (ता.०४) उघडकीस आली असून, तुलशिदास पंढरी बागडे (४५) रा. गांधी चौक लाखांदुर असे मृतक इसमाचे नाव आहे. प्राप्त माहितीनुसार मृतक हा पाच ते सहा वषार्पासुन बाहेर गावी मजुरीने काम करायला जात होता. मजुरीतून मिळणाºया पैशातून दारू पिणे व अति दारू पिल्यानंतर कुठेही पडणे किंवा झोपून राहणे असा मृतक तुलशिदासचा नित्यक्रमच झालाहोता. त्यामुळे कुटुंबिय देखील तो घरी आला की गेला याकडे लक्ष देत नसायचे. दरम्यान लाखांदुर कृषी उत्पन्न बाजार समिती परीसरात मुकेश लांडगे मु. सावरगाव यांचे झुनका भाकर केंद्र आहे.

झुनका भाकर केंद्राला झोपडीचे पांघरून असून, सभोवताल बांबुच्या ताटे लावले आहेत. झुनका भाकर केंद्राचे मालक मुकेश लांडगे सोमवारला (ता.०३) सायंकाळी ६.३० वाजता सुमारास झुनका भाकर केंद्र बंद करून घरी गेल्यानंतर मंगळवारला (ता.०४) नेहमीप्रमाणे सकाळी ८ वाजता सुमारास दुकान उघडायला आलेअसता, मृतक झुनका भाकर केंद्रातील खुर्चीवर निद्रावस्थेत बसलेले दिसून आला. त्यामुळे त्याला आवाज दिला असता, तो मरण पावलेल्या अवस्थेत दिसुन आला आहे. सदर घटनेची माहिती गावात पसरल्यानंतर मृतकाचा भाऊ रमेश पंढरी बागडे यांच्या तक्रारीवरून लाखांदूर पोलीसात मर्ग दाखल करण्यात आला आहे. मृतकास अति मद्य प्रासन झाल्याने घरी जाता आले नसल्यामुळे त्याने झुनका भाकर केंद्र उघडून खुर्चीवर बसून आराम केला असता, जेवन व पाणी न मिळाल्याने त्याचा मृत्यु झाला असवा असा अंदाज वर्तविला जात असून, पुढील तपास ठाणेदार रमाकांत कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली चालू आहेत.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *