पडलेल्या धानाला फुटले अंकुर

भंडारा पत्रिका/तालुका प्रतिनिधी मोहाडी : दिवाळीपूर्वी तालुक्यात परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावली होती. त्यात उभे धानपिक झोपले आणि बांध्यामध्ये पाणी साचले होते. त्यामुळे धानाला कोंबे फुटली असून शेतकºयांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. यंदाच्या खरीप हंगामापूर्वी हवामान खात्याने समाधानकारक पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त केला होता. त्यामुळे शेतकºयांनी मोठ्या अपेक्षेने खर्च करून धानाची पेरणी केली. खरीप हंगामात सुरूवातीपासूनच दमदार पाऊस झाला. त्यामुळे तलाव, विहीर आणि कालव्यांतून सोडण्यात येणाºया पाण्याची गरज भासली नाही. शेतात चांगले पीक डोलत असतानाच परतीच्या पावसाने अचानक धडक दिली. त्यामुळे धानपिकाचे नुकसान झाले. त्यातच धानपिक निघण्याच्या स्थितीत असताना परतीच्या पावसाने हजेरी लावल्याने पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. काही शेतकºयांच्या शेतात पावसाचे पाणी साचून राहिल्याने पाणी बांध्यात साचून राहिले व त्यात धानपिक पडून राहिले. त्यामुळे धानाला अंकुर आले. धान कापणीची वेळ येईपर्यंत अंकुर आलेल्या धानाला पन्हे उगवले. अनेक ठिकाणी नर्सरीचे स्वरूपही दिसून आले. अनेकांच्या शेतात पडलेले धान कुजले व नासाडी होऊन नुकसान झाले. याचा फटका धान उत्पादनावर होत आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *