लांडग्याच्या हल्ल्यात तीन शेळ्या ठार तर तीन जखमी

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी लाखांदूर : जंगलातून शिकारीच्या शोधात मध्यरात्रीच्या सुमारास लांडग्याने गावात प्रवेश करून गोठ्यात बांधून ठेवलेल्या शेळ्यावर हल्ला चढवीत तीन शेळ्या ठार तर तीन शेळ्या जखमी केल्याची घटना ५ आगस्ट रोजी सकाळच्या सुमारास लाखांदूर तालुक्यातील नांदेड येथे उघडकीस आली. गुरुदेव साठवणे रा. नांदेड असे नुकसानग्रस्त पशुपालकाचे नाव असून यात ४० हजार रुपयाचे नुकसान झाले असल्याचा अंदाज आहे. दरवर्षी शेती व्यवसाय धोक्यात येत असून शेती परवडत नसल्याने अनेक शेतकरी शेतीला जोडधंदा म्हणून पशुपालन व्यवसाय करतात. अशाच प्रकारे गुरुदेव साठवणे हे शेती व्यवसाया सोबत शेळी पालन व्यवसाय करीत होते. घटनेच्या दिवशी सर्व शेळ्या चराई करून आणल्यानंतर घरालगत असलेल्या गोठ्यात बांधून ठेवल्या होत्या.

मात्र शिकरीच्या शोधात जंगलातून भटकंलेल्या लांडग्याने मध्ये रात्रीच्या सुमारास गावात प्रवेश करून गोठ्यात बांधून असलेल्या शेळ्यावर हल्ला चढवीला. यात तीन शेळ्या ठार तर तीन शेळ्यांना गंभीर जखमी केले आहे. पशुपालक सकाळी उठले व गोठ्याकडे जाऊन बघितले असता हा प्रकार लक्षात आला. या घटनेची माहिती लाखांदूर वन विभागाला देण्यात आली. घटनेची माहिती मिळताच वनपरीक्षत्र अधिकारी रुपेश गावित यांच्या मार्गदर्शनात वनरक्षक यांनी घटनास्थळी पोहचून पंचनामा केला. पशुपालकाचे यात ४० हजाराचे नुकसान झाले असून त्यांनी शासनाने नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.