वन विभागाच्या जागेतून मुरुमाचे अवैध खोदकाम

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी तिरोडा : तिरोडा तालुक्यातील इंदोरा सहवनक्षेत्र ठाणेगाव येथील गट क्रमांक ७३८ वन विभाग विभागाच्या जागेतून ३०० ब्रास मुरुमाचे अवैध खोदकाम करून वाहतूक संबंधित वन अधिकाºयांच्या संगनमताने करण्यात आलेले आहे. याबाबत मौका पंचनामा २० आॅक्टोबर २०२२ रोजी तिरोडा वनपरिक्षेत्र अधिकारी आर.जी. मून व महसूल अधिकाºयांनी केलेला आहे. सदर प्रकरण दाबण्याचा प्रयत्न संबंधित वन अधिकारी करीत असल्यामुळे शासनाचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडालेला आहे, असा आरोप पत्रकार राजेशकुमार तायवाडे यांनी केलेला आहे. या प्रकरणाकडे वन मंत्री व पालक मंत्री सुधीर मुंगटीवार यांनी गांभीर्याने लक्षदेऊन शासनाचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडविणाºया वन अधिकाºयांवर तात्काळ निलंबनाची कार्यवाही करण्यात यावी. तसेच खोदकाम करून घेऊन जाणाºयांवर दंडात्मक कार्यवाही करावी जेणेकरून भविष्यात अशा प्रकारचे प्रकरण घडणार नाही व शासनाचा महसूल बुडविण्याचा कोणीही वन अधिकारी प्रयत्न सुद्धा करणार नाहीत, अशी तक्रार राजेशकुमार तायवाडे यांनी केलेली आहे.तसेच सदर ठिकाणावरून खोदकाम करण्यात आलेला मुरुमाचावापर कोणत्या ठिकाणी करण्यात आलेला आहे, याची जाणीव तिरोडा वनपरिक्षेत्र अधिकारी आर.जी. मून यांना माहिती असून सुद्धा संबंधित अधिकाºयांनी अज्ञात आरोपीविरुद्ध वन कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल केलेला आहे. वरिष्ठ अधिकाºयांच्या हातून स्थानिक चौकशी केल्यावर माहीत होईल की, एवढ्या मोठ्या प्रमाणात मुरुमाचा अवैधपणे खोदकाम करून वाहतूक कोणत्या ठिकाणी करून मुरुमाचा वापर करण्यात आलेला आहे. मात्र याची जाणीव वनपरिक्षेत्र अधिकारी आर.जी. मून यांना माहिती असून सुद्धा सदर प्रकरण दाबण्याचा प्रयत्न संबंधित अधिकारी करीत आहेत, असा आरोप राजेशकुमार ंतायवाडे यांनी केलेला आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *