हरणांच्या बछडयाची कुत्र्याच्या तावडीतून सुटका

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी मोहाडी:तालुक्यातील आंधळगाव पोलीस स्टेशन हद्दीत येत असलेल्या पालडोंगरी शेतशिवारात शेतकºयांनी हरिणाच्या बछडयाची कुत्र्याच्या तावडीतून सुटका केली. पालडोगरी शेतावर छोट्या हरणाच्या बछडयाला गुरुवार दि.१३ जुलै २०२३ ला सायंकाळी ६ वाजता लावारीस कुत्र्यांनी पकडून जखमी केले.त्यावेळी शेतावर असलेल्या व्यास डोगरवार यांच्या लक्षात येताच हरणाच्या बछडयाला दूर करून वाचवले.त्याला तिथेच पकडून ठेवले.त्यांनी सामाजिक कार्यकर्ते श्याम कांबळे यांना या घटनेची माहिती भ्रमणध्वनीवर दिली. आंधळगाव येथील वनविभागाचे फिल्ड वर्कर वानखेडे यांना माहिती दिली.घटनेची माहिती देताच लगेच त्यांनी आपला कर्मचारी शेतावर पाठवुन पाहनी केली.त्या बछडयाला आधळगाव पशुवैद्यकीय रुग्णालय येथे उपचारासाठी नेण्यात आले. पण दवाखाना अवस्थेत होते.वनविभागाचे कर्मचारी यांना जखमी हरणाच्या बछडयाला स्वाधीन केले.मोहाडी येथे पशुवैद्यकीय रुग्णालयात घेऊन गेले. याप्रसंगी शेतकरी व्यास डोगरवार,श्याम कांबळे,जिवन डोये, वनकर्मचारी उपस्थित होते.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *