भेल सुरु झाल्यास प्रफुल पटेल हेच आमचे नेते -डॉ. सुहास फुंडे

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : जिल्ह्यातील साकोली येथील भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेडचा (भेल) वीज निर्मितीसाठी लागणारीी उपकरणे तयार करण्याचा प्रकल्प १० वर्षांपासून रखडला आहे. सध्या प्रकल्पासाठी अधिग्रहित जमिनीवर गुरे-ढोरे चरताना दिसतात. आता तर सार्वजनिक क्षेत्रातील प्रकल्प गुंडाळण्याचेच धोरण केंद्राने स्वीकारल्याने या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे काय होणार, हा प्रश्न अनुत्तरित आहे. भेलच्या तामिळनाडूमधील तिरुचिरापल्ली येथे सरकारी वीज उपकरणे निर्मितीचे एक युनिट (फॅब्रिकेशन) आहे, परंतु देशाच्या इतर भागांमध्ये जड उपकरणे नेणे दळणवळणाच्या दृष्टीने परवडणारे नव्हते. त्यासाठी कंपनीला देशातील मध्यवर्ती ठिकाणाची गरज होती. त्यामुळे भंडारा जिल्ह्याची निवड करण्यात आली. तसेच विदर्भातील वीज प्रकल्पांची वाढती संख्या आणि तेथे लागणाºया वीजनिर्मिती उपकरणांची गरज ही बाबही लक्षात घेण्यात आली.

२०१३ च्या मे महिन्यामध्ये प्रकल्पाचे भूमिपूजन झाले होते. त्यासाठी २७० शेतकºयांकडून ५१० एकर जमीन संपादित करण्यात आली. प्राथमिक स्वरूपाच्याबांधकामावर ५०० कोटी रुपये खर्च करण्यात आले. सुरक्षा भिंत बांधण्यात आली. या प्रकल्पातून सुमारे ५ हजार प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार निर्मितीची अपेक्षा होती. या प्रकल्पासाठी २०१२ पासून प्रयत्न सुरू झाले होते. त्यासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने (एमआयडीसी) साकोली तालुक्यातील मुंडीपार येथील जमीन संपादित केली. संरक्षक भिंतीनंतर प्रकल्प उभारणीचे कामाला सुरू झाले. पण त्यानंतर नऊ वर्षांपासून सर्व कामे ठप्प आहेत. आता येथील सुरक्षा भिंत खचली असून मुंडीपार आणि बामणीचे गावकरी येथील ओसाड जागेचा वापर जनावरांना चरण्यासाठी करीत आहेत. प्रफुल्ल पटेल खासदार असताना त्यांनी या प्रकल्पासाठी पुढाकार घेतला होता. म्हणून जर प्रफुल्ल पटेल यांची इच्छा असेल तर हा प्रकल्प पूर्ण होऊ शकतो,कारण आज त्यांच समर्थीत सरकार केंद्र व राज्यामध्य आहे ,जर प्रफुल भाई भेल करतील तर भंडारा गोंदिया जिल्यातील हजारों युवक यांचे समर्थन याना प्राप्त होईल.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *