आगीत संपूर्ण घर भस्मसात

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी सिहोरा : पोलिस स्टेशन सिहोरा अंतर्गत येणा-या सिंदपुरी येथील जितेंद्र शंकर कटरे यांच्या घराला आग लागून अंदाजे पाच लाख रुपयाचे नुकसान झाल्याचे वृत्त आहे. सदर घटना आज २६ रोजी पहाटे ४ वाजताच्या सुमारास घडली. जितेंद्र कटरे व कुटूंबिय हे पहाटे साखरझोपेत असतानाच घराच्या मागील बाजूला आग लागल्याचे दृश्य शेजा-यांना दिसताच त्यांनी आरडाओरडा केली. त्यामुळे कटरे कुटूंबिय घराबाहेर पडले व पाहता पाहता संपूर्ण घर आगीच्या विळख्यात सापडले. प्रसंगी ग्रामस्थांनी तत्परता दाखवून स्वयंपाक खोलीतून गॅस सिलेंडर बाहेर काढल्याने मोठा अनर्थ टळला.

मात्र घरातील सर्व जीवनावश्यक वस्तू जळून खाक झाल्याने कटरे कुटूंबाचे अंदाजे पाच लाख रुपयाचे नुकसान झाले. घटनेचे वृत्त कळताच सिहोराचे पोलिस निरीक्षक निलेश गोसावी हे ताफ्यासह घटनास्थळी दाखल झाले. राष्टÑवादी काँग्रेसचे तुमसर तालुकाध्यक्ष धनेंद्र तुरकर, पंचायत समिती सदस्य सुभाष बोरकर, सरपंच स्वप्निल बोरकर, महसूल विभागाचे प्रतिनिधी व पोलिस पाटील यांनी सुद्धा घटनास्थळ गाठून पंचनामा केला. आगीमुळे कटरे यांचे घरही भस्मसात झाल्याने त्यांना दुसड्ढयांकडे आश्रय घ्यावा लागला असून शासनाने त्वरित मदत करावी अशी मागणी ग्रामवासियांनी केली आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *