भंडाºयातील युवकांचा खंडवा येथे अपघात एक ठार तिघे जखमी

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : देवदर्शन करून परत येणा-या भंडाराच्या तरुणांच्या वाहनाला मध्यप्रदेशातील खंडवा जवळ अपघात होऊन एकाचा मृत्यू झाल्याची घटना आज २६ फेब्रुवारी रोजी घडली. शूभम चौधरी असे मृत झालेल्या तरुणाचे नाव असून तो भंडारा भाजयुमोचा सचिव होता. शूभम चौधरी याच्यासह त्याचे मित्र सौरभ कूंभलकर, प्रणव बालपांडे, संकेत गोबाडे हे एमएच ३१ /ईए ३६५३ क्रमांकाच्या गाडीने मध्यप्रदेशातील उजैन येथे दर्शनासाठी गेले होते. दर्शन आटोपून आज परत येत असताना दुपारच्या सुमारास खंडवा जवळ जावर ते सेलदा मार्गावर गाडीचा समोरचा टायर फूटला.

अनियंत्रित झालेली गाडी रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर जावून आदळली. यावेळी सौरभ हा गाडी चालवत होता. शूभम चौधरी वगळता इतर सर्वांनी सीटबेल्ट लावले असल्याने त्यांना गंभीर दुखापत झाली नाही, मात्र शूभमचा या अपघातात मृत्यू झाला. शूभम हा भारतीय जनता युवा मोर्चाचा भंडारा जिल्हा सचिव होता. इतर तिघेजण जखमी असून त्यांच्यावर खंडवा येथील रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती आहे. अपघाताची माहिती कळताच भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शूभम याच्या घरी माधव नगर येथे गर्दी केली होती. त्याचे पार्थिव उद्या २७ रोजी भंडारा येथे आणले जाणार असल्याचे समजते.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *